---Advertisement---

भारतीय दिग्गजांवर स्तुतीसुमनांची उधळण! सचिनपासून धोनीपर्यंत ‘या’ खेळाडूंचे केले राशिद खानने कौतुक

On: शनिवार, जून 5, 2021 5:40 PM
---Advertisement---

क्रिकेट इतिहासात दिग्गज फिरकीपटू होऊन गेले आहेत, मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, अनिल कुंबळे यांसारख्या फिरकी गोलंदाजांनी फलंदाजांना आपल्या तालावर अक्षरश: नाचवले. वर्तमान क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानच्या राशीद खानची तुलना केली जाते. तो आपल्या जादुई आणि कंजूस गोलंदाजी करिता प्रसिद्ध आहे.

जगभरात होण्याऱ्या लीग स्पर्धेत त्याला आपल्या संघात घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ होत असते. इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) स्पर्धेत राशीद हैद्राबाद संघाकडून खेळतो. राशीदने शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतेवेळी बऱ्याच खेळाडूंच कौतुक केलं.

त्याचबरोबर त्याने क्रिकेट जगतातील कोणत्या महान खेळाडूंना गोलंदाजी करायला आवडेल या प्रश्नाचेही उत्तर दिले. रशीद खानने या प्रश्नाचे उत्तर देतांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं. त्यामुळे भारतीय चाहत्यांना निश्चितच आनंद झाला असेल. सोबतच त्याने महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि विराट कोहली यांचे एका शब्दात तुलना केली. त्याने युवराजला ‘सिक्सर किंग’ म्हणून संबोधित केले, तर विराटला ‘किंग’ . याव्यतिरिक्त धोनीविषयी विचारणा झाल्यावर त्याने उत्तर दिले की, धोनी विषयी मत एक शब्दात मांडूच शकत नाही.

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) साठी आबुधाबीत झालाय दाखल:

अफगाणिस्तानचा हा स्टार फिरकीपटू सध्या आबुधाबीत दाखल झाला आहे, जिथे तो पीएसएल स्पर्धेच्या उर्वरित 20 सामने खेळताना दिसून येईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राशीदने आपल्या संघाकडून चांगली कामगिरी केली असली तरी त्याच्या संघाने सुमार प्रदर्शन केले आहे. स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी हैद्राबाद संघाने 7 सामने खेळेल, त्यात त्यांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला.

महत्त्वाच्या बातम्या – 

वय छोटे पण पराक्रम मोठे! २४व्या वर्षापर्यंत ‘या’ भारतीयांनी पार केले षटकारांचे ‘अर्धशतक’

कमालच नाही का! ‘दादा’ अन् त्याचा रेकॉर्ड ब्रेकर डेव्हन कॉनवेमध्ये आहेत ‘या’ ६ गोष्टी समान

फलंदाजांची फिरकी घेणारा भज्जी बनला ‘कूक’, त्याने बनवलेला पदार्थ बघून तोंडात येईल पाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---