अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला मागे टाकत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला. रशीद सध्या SA20 मध्ये खेळत आहे. ज्याद्वारे त्याने सर्वाधिक टी20 विकेट्स घेण्याचा किताब मिळवला आहे.
रशीद SA20 मध्ये एमआय केपटाऊनचे नेतृत्व करत आहे. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना पार्ल रॉयल्स आणि एमआय केपटाऊन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात, रशीद खानने पहिली विकेट घेताच ब्राव्होचा विक्रम मोडला. ब्राव्होने त्याच्या टी20 कारकिर्दीत 631 विकेट्स घेतल्या आहेत. तर रशीद खानने आता 633 विकेट्स घेतल्या आहेत.
रशीद खानने ऑक्टोबर 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मध्ये पदार्पण केले. ज्या सामन्यात त्याने फक्त 1 विकेट घेतली. आता 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
गेल्या वर्षी (2024) क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ड्वेन ब्राव्होने फेब्रुवारी 2006 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी20 मध्ये पदार्पण केले. ब्राव्होला हा आकडा गाठण्यासाठी सुमारे 18 वर्षे लागली. तर रशीद खानने फक्त 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत हा मोठा आकडा गाठला.
ड्वेन ब्राव्होने 582 टी20 सामन्यांमध्ये 24.40 च्या सरासरीने 631 विकेट्स घेतल्या. तर रशीद खानने फक्त 461 सामन्यांमध्ये 18.07 च्या सरासरीने 633 विकेट्स घेतल्या. यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा सुनील नारायण आहे. ज्याने आतापर्यंत 573 बळी घेतले आहेत. यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर चौथ्या आणि बांग्लादेशचा शकिब अल हसन पाचव्या क्रमांकावर आहे.
🚨 HISTORY BY RASHID KHAN 🚨
– Rashid Khan becomes the leading wicket taker in T20 History (632 wickets).
1000 wickets on the way in future 🐐 pic.twitter.com/W4nFmkRXv7
— Johns. (@CricCrazyJohns) February 4, 2025
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
रशीद खान (अफगाणिस्तान) – 633 विकेट्स
ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) – 631 विकेट्स
सुनील नारायण (वेस्ट इंडिज) – 573 विकेट्स
इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – 531 विकेट्स
शकिब अल हसन (बांगलादेश) – 492 विकेट्स
हेही वाचा-
डेव्हिड मिलरने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्स-फाफ डु प्लेसिस जवळपासही नाही
IND VS ENG; चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी रोहित विराटला फाॅर्ममध्ये परतण्याची शेवटची संधी, नाहीतर….
नागपुर पोलिसांचा खाक्या! थेट टीम इंडियाच्या सदस्यालाच संघासोबत सामील होताना थांबवले!