जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेला अफगाणिस्तानचा राशिद खान विवाहबद्ध झाला आहे. गुरुवारी (3 ऑक्टोबर) काबूलमध्ये राशिदचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच्या लग्नाला नातेवाईक आणि जवळचे मित्र तसेच अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू उपस्थित होते. ज्या ठिकाणी राशिदचं लग्न झालं, ते ठिकाण सुंदरपणे सजवण्यात आलं होतं. यासोबतच कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली होती.
राशिद खानच्या लग्नात त्याच्या जवळच्या नातेवाईकांसह अफगाणिस्तान संघाचे खेळाडूही उपस्थित होते. सहकारी मोहम्मद नबीनं सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो राशिद आणि इतर खेळाडूंसोबत दिसतोय. “एकमेव किंग खान, राशिद, तुझ्या लग्नाबद्दल अभिनंदन! तुला आयुष्यभर प्रेम, आनंद आणि यश मिळो ही शुभेच्छा”, असं त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
राशिदचा विवाह काबूलमधील एका हॉटेलमध्ये पार पडला. ही जागा खूप छान सजवण्यात आली होती. येथील एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये फटाक्यांसोबतच इतर लोकही दिसत आहेत.
Congratulations to the one and only King Khan, Rashid Khan, on your wedding! Wishing you a lifetime of love, happiness, and success ahead.@rashidkhan_19 pic.twitter.com/fP1LswQHhr
— Mohammad Nabi (@MohammadNabi007) October 3, 2024
अफगाणिस्तानच्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर राशिदचं अभिनंदन केलं. त्याचं लग्न ज्या हॉटेलमध्ये झालं, त्या हॉटेलबाहेर फटाके फोडण्यात आले. राशिदच्या लग्नाच्या ठिकाणी अनेक लोक बंदुका घेऊन फिरताना दिसले. याशिवाय अनेक क्रिकेटपटूंनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
राशिद खानची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्यानं अफगाणिस्तानसाठी 105 एकदिवसीय सामन्यांमध्ये 190 विकेट घेतल्या. याशिवाय त्यानं 1322 धावा देखील केल्या आहेत. राशिदनं 93 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 460 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यानं 152 विकेट्स घेतल्या आहेत. राशिदचा आयपीएलमधील रेकॉर्डही शानदार आहे. आयपीएलमध्ये त्यानं 149 विकेट घेण्यासह 545 धावाही केल्या आहेत.
हेही वाचा –
सर्फराज खान भावूक, दुखापतग्रस्त भाऊ मुशीरला समर्पित केली द्विशतकी खेळी
द्विशतक हुकले पण टीम इंडियासाठी दावा मजबूत, इराणी कपमध्ये या खेळाडूची मोठी कामगिरी
वयाच्या 12 व्या वर्षी दिल्लीला पोहोचला, राहण्यासाठी घर नव्हते; या स्टार खेळाडूची कारकीर्द खूपच संघर्षमयी