---Advertisement---

कडक! फुल टॉस चेंडूवर राशिदने खेचला ‘नो लूक’ षटकार, व्हिडिओ पाहा

On: सोमवार, जानेवारी 31, 2022 6:13 PM
Rashid-Khan
---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला (Pakistan super league) जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुलतान सुलतान (Multan Sultan) आणि लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात लाहोर कलंदर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी देखील या संघातील फलंदाज राशिद खान (Rashid Khan)  भरपूर चर्चेत आला आहे. त्याने या सामन्यात खेळलेल्या एका शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Rashid Khan no looks six video)

नेहमी गोलंदाजीने धूमाकूळ घालणाऱ्या राशिद खानने या सामन्यात आपल्या फलंदाजीने हल्लाबोल केला. लाहोर कलंदर्स संघासाठी ४ चेंडूंमध्ये १७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने २ षटकार आणि १ चौकार मारला होता. त्याने या डावात शहनवाज धानीच्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक षटकार मारला. जे पाहून समालोचक देखील आश्चर्यचकित झाले होते.

तर झाले असे की, राशिद खानची फलंदाजी सुरू असताना २० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने लेग साईडच्या दिशेने फुलटॉस चेंडू टाकला होता. ज्यावर राशिद खानने खाली वाकून लेग साईडच्या दिशेने जोरात बॅट फिरवली. तो चेंडू बॅटला लागताच स्टेडियमच्या बाहेर ६ धावांसाठी गेला. राशिद खानने खेळलेल्या या नो लूक शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहते देखील या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

https://twitter.com/thePSLt20/status/1487385091760431105

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर लाहोर कलंदर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद २०६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुलतान सुलतान संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. गतवर्षी आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केलेला राशिद खान यावर्षी अहमदाबाद संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. त्याला अहमदाबाद संघाने १५ कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

शाहरुखने ‘या’ संघासाठी खेळण्याची व्यक्त केली इच्छा; म्हणाला…

‘दीपक चहर असेल मेगा लिलावात सर्वात महागडा भारतीय गोलंदाज”

हे नक्की पाहा:

वयाच्या ५व्या वर्षीच Ruturaj Gaikwadने मॅक्क्युलमला पाहून क्रिकेटर व्हायचा निर्णय घेतला । Life Story

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---