इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान प्रीमियर लीग या दोनही स्पर्धेची तुलना मागील काही दिवसांपासून केली जात आहे. काही दिग्गज खेळाडूंनी देखील आयपीएल आणि पीएसएलच्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तर या दोन्हीही स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना ही आयपीएल आणि पीएसएल यांच्यामध्ये काय फरक आहे या बाबतही विचारले जात आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खानला देखील हाच प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने आपली प्रतिक्रिया ही दिली आहे.
राशिदची आयपीएल आणि पीएसएलच्या तुलनेबद्दलची प्रतिक्रिया
राशिद खान हा खेळाडू आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा खेळतो. याच कारणामुळे राशिदला आयपीएल आणि पीएसएल यांची तुलना करण्यासाठी सांगितले होते. यावर उत्तर देताना राशिद म्हणाला की,”मी पीएसएलचे आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. तर मी आयपीएलचे सामने मागील 5 वर्षापासून खेळत आहे. मी या दोन्ही स्पर्धेची तुलना तेव्हाच करू शकेल जेव्हा मी पीएसएलचे आणखी काही सामने खेळेन. वेगवेगळ्या मैदानावर असंख्य लोकांच्या गर्दीत मी सामने खेळू शकेल, तेव्हाच याबद्दल काहीतरी मत मांडू शकेल.”
सध्या राशिद पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचा भाग आहे. आणि त्याने संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शनही केले. पेशावर जाल्मी विरुद्ध सामन्यांमध्ये राशिदने 5 बळी घेतले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. (Afghanistan team spinner Rashid Khan also reacted to the IPL and PSL)
राशिदची संघासाठीची शानदार कामगिरी
लाहोर फ्रॅंचाईजीसाठी राशिदला संघामध्ये सहभागी करून घेणे महत्त्वाचे ठरले आहे. लाहोर कलंदर्स सध्या पीएसएल 2021 च्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. राशिदने आतापर्यंत 16.5 च्या सरासरीने 6 सामन्यांमध्ये 8 बळी घेतल्या. राशिदचा इकॉनमी रेट 5.5 चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गज गोलंदाजाने निवडला अंतिम सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ, सिराजला वगळून इशांतला दिले स्थान
काय सांगता! ऑस्ट्रेलियन खेळाडू सोडणार आयपीएल? वाचा काय म्हणाले मुख्य निवडकर्ता
पदार्पणाच्या सामन्यातच चमकली ‘ही’ भारतीय फिरकीपटू, दिवंगत वडिलांना समर्पित केली कामगिरी