सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीगची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. या लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडू आपापल्या संघांसाठी सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसतात. नुकताच या लीगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान (Rashid Khan) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफवर (Haris Rauf) आश्चर्यकारक शॉट मारताना दिसत आहे.
रशीदचा हा शॉट एवढा अप्रतिम होता की हारिस रौफ (Haris Rauf) तो पाहून थक्क झाला. हारिस रौफवर (Haris Rauf) फलंदाजानं आश्चर्यकारक शॉट मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. आजकाल अनेक फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर जास्त आक्रमक होताना दिसत आहेत. राशीदचा हा फटका इतका शानदार होता की, कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूजवळही जाऊ शकला नाही आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पार गेला. या सामन्यात राशिदनं 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 13 धावा केल्या.
It’s Haris Rauf vs Rashid Khan at #TheHundred! 👀 pic.twitter.com/RFAKew1ZoA
— The Hundred (@thehundred) August 3, 2024
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर राशिद खानचा (Rashid Khan) संघ ट्रेंट रॉकेट्सला हरिस रौफचा (Haris Rauf) संघ वेल्श फायरकडून 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेल्श फायरनं 129 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ट्रॅट रॉकेट्स संघ केवळ 125 धावा करु शकला. या सामन्यात वेल्श फायरसाठी हॅरिस रौफनं शानदार गोलंदाजी करत 2 विकेट्स घेतल्या.
राशिद खानबद्दल (Rashid Khan) बोलायचं झालं तर त्याचं वय सध्या 25 वर्ष 319 दिवस आहे. तो राष्ट्रीय संघ अफगाणिस्तान संघाकडून खेळतो. त्यानं अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत 5 कसोटी, 103 एकदिवसीय आणि 93 टी20 सामने खेळले आहेत. 5 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 34 विकेट्स घेतल्या आहेत. 103 एकदिवसीय सामन्यांमध्ये 163 विकेट्स घेतल्या आहेत. तर 93 टी20 सामन्यात त्यानं 152 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅच घेतल्यानंतर केला बिहू डान्स, विराट कोहलीचं अनोखं सेलिब्रेशन तुफान व्हायरल
IND vs SL निर्णायक सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 241 धावांचं आव्हान
IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!