अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खानचे मागील काही दिवसांपासून त्याच्या अफलातून कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्याकडे असलेल्या चेंडू वळवण्याचे कौशल्यानमुळे अनेक चांगले फलंदाज खेळताना अडचणीत आले आले आहेत.
त्याच्या याच कौशल्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही त्याचे कौतुक करताना तो टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटू असल्याचे म्हटले आहे.
रशीद ज्या ठिकाणी त्याच्या भावांसोबत क्रिकेट खेळायला शिकला ते ठिकाण त्याने ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओतून दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या भावांसोबत क्रिकेट खेळत आहे. त्याचबरोबर त्याचा भाऊ अमीर खानही त्याच्या प्रमाणेच चेंडू वळवत असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे.
रशीदने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘ मी माझ्या भावांसोबत येथेच घरी क्रिकेट खेळायला सुरवात केली. मोठा भाऊ अमीर खानकडेही चेंडू वळवण्याचे कौशल्य आहे.’
This is how from where I start my ckt playing with brothers at home big bro @amirkhan6362 has some skills to turn the ball #familylegspinners 🙌🏻🙌🏻 pic.twitter.com/2D47YhW7O5
— Rashid Khan (@rashidkhan_19) June 19, 2018
रशीदने काही दिवसांपूर्वीही ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये तो जेव्हाही घरी जातो तेव्हा त्याच्या भावांबरोबर क्रिकेट खेळत असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर त्याने असेही सांगितले होते की त्याचे सगळे भाऊ फिरकी गोलंदाजी करतात.
रशीद भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या अफगाणिस्ताच्या पहिल्याच कसोटी सामन्यात अफगाणिस्तानच्या संघात होता. मात्र त्याला या सामन्यात खास कामगिरी करता आली नव्हती.
यानंतर अफगाणिस्तान आता आॅगस्ट महिन्यात आयरलँड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते 3 टी20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहेत.
रशीद सध्या टी20 च्या आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. तर वनडेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीबाबत आणखी एका यष्टीरक्षकाचे मोठे वक्तव्य
–भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी असा आहे आयरलँडचा संघ
–धोनी-कोहलीवर या युवा क्रिकेटपटूची स्तुतीसुमने