---Advertisement---

विमान कोसळलं! हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात राशिद गोल्डन डक; समालोचकांनाही आवरेना हसू

On: शुक्रवार, जानेवारी 8, 2021 5:34 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी२० टूर्नामेंट बिग बॅश लीगचा यंदा दहावा हंगाम चालू आहे. या हंगामातील ३३ वा सामना शुक्रवारी (०८ जानेवारी) ऍडलेड स्ट्राईकर्स विरुद्ध रेनेगेड्स संघात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऍडलेड स्ट्राईकर्सने ७ विकेट्स गमावत १२२ धावा केल्या. दरम्यान या संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या राशिद खानचा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न फसला.

झाले असे की, राशिद डावातील १९व्या षटकात फलंदाजीसाठी आला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीवर उतरलेल्या या शिलेदाराने सामन्याची परिस्थिती पाहता पहिल्याच चेंडूपासून आक्रमक सुरुवात करण्याचा विचार केला. त्यादृष्टीने त्याने पहिल्याच चेंडूवर लेग साइडला त्याचा आवडता हेलिकॉप्टर शॉट लगावला. परंतु तिथे त्याची ताकद कमी पडली. त्याबरोबरच लेग साइडला आधीपासूनच विरुद्ध संघाचे दोन खेळाडू सावध असल्याने त्यांनी राशिदचा अचूक झेल पकडला.

राशिदने फलंदाजीसाठी मैदानावर येताच षटकार खेचण्याचा प्रयत्न केला; परंतु तो गोल्डन डक झाल्याने तोंडघशी पडल्याचे पाहून सामन्याचे समालोचन करत असलेल्या समालोचकालाही हसू आवरले नाही. एवढेच नव्हे तर, बिग बॅश लीगनेही राशिदचा बाद होतानाचा व्हिडिओ शेअर करत त्याची थट्टा केली आहे.

“आम्हाला राशिदचा हेलिकॉप्टर शॉट खूप जास्त आवडतो. पण कदाचीत पहिल्याच चेंडूवर हा शॉट मारण्यासाठी ती योग्य वेळ नव्हती”, असे त्यांनी व्हिडिओला मजेशीर कॅप्शन दिले आहे. सोबतच हसतानाचे इमोजीही टाकले आहेत. राशिदच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://twitter.com/NeilVirani/status/1347474348014239745?s=20

https://twitter.com/armylenovo/status/1347471246250807300?s=20

https://twitter.com/IndrakumarV2004/status/1347475370581217284?s=20

जरी राशिद या सामन्यात फलंदाजीत चमकदार कामगिरी करु शकला नसला. तरी त्याने हातखंडा असलेल्या गोलंदाजीत २ गडी बाद केले. ३ षटकात ४.६७च्या इकोनॉमी रेटने अवघ्या १४ धावा घेत त्याने या दोन विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅमरॉन ग्रीनने एकअंगी झुकत पकडला शुबमन गिलचा शानदार झेल, पाहा व्हिडिओ

व्वा रे व्वा! पठ्ठ्याने बर्थडे दिवशी घेतली रोहित शर्माची विकेट अन् घातली मोठ्या विक्रमाला गवसणी  

“स्मिथचा रन आउट माझ्यासाठी कारकिर्दीतील अतिशय खास क्षण”, रवींद्र जडेजाची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---