---Advertisement---

“बुमराहकडे पाहा…” पराभवानंतर माजी खेळाडू पाकिस्तानी गोलंदाजांवर भडकला

On: मंगळवार, ऑगस्ट 27, 2024 10:29 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर अनेक पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू पाकिस्तान संघावर चिडताना दिसले आहेत. तत्पूर्वी या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडू राशिद लतीफ (Rashid Latif) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लतीफ म्हणाला की, पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची गती पहिल्यासारखी राहिली नाही, ती आता हळू झाली आहे. त्यानं बुमराहशी खेळाडूंची तुलना देखील केली आहे.

सध्या बांगलादेश संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्यातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशनं 10 गडी राखून पाकिस्तानला घरच्या मैदानावर धूळ चारली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. बांगलादेशचा संघ कसोटीमध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीही जिंकला नव्हता परंतू शानदार विजयासह त्यांनी हा टॅग हटवला. बांगलादेशनं या विजयासह या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

राशिद लतीफनं (Rashid Latif) पाकिस्तानी गोलंदाजांना निशान्यावर धरलं आहे. तो म्हणाला, “सगळ्या जगाला माहिती होतं की, आमची वेगवान गोलंदाजी संघाचा जीव होती. पण आता तसं राहिलं नाही. आमच्या टाॅप गोलंदाजांच्या देखील गतीमध्ये आता फरक दिसून येत आहे. रावलपिंडीमध्ये झालेल्या पराभवाचं हे सुद्धा एक कारण आहे. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद यांनी वेगवान गोलंदाजी 145च्या गतीपासून सुरु केली होती. पण आता ती गती 130 वर आली आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “तुम्ही जोफ्रा आर्चरला पाहा, दोन वर्षाच्या दुखापतीनंतर त्यानं पुनरागमन केलं पण त्याच्या गोलंदाजीची गती ही धारदार राहिली. हीच गोष्ट भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत (Jasprit Bumrah) घडली आहे. तो सुद्धा अनेक दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला पण त्याची गोलंदाजी नेहमीच धमाकेदार राहिली.”

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2025: केएल राहुलला मिळणार का संघात स्थान? लखनऊ घेणार पत्रकार परिषद
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड…!
कडवट शेवटानंतरही डेविड वॉर्नरला आली हैदराबादची आठवण, व्यक्त केली खेळण्याची इच्छा?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---