भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा मागील काही काळापासून आपल्या फॉर्मशी झगडत आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतही तो लयीत दिसला नाही. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली गेलीये. काहीजण असे म्हणत आहेत की, विराट आपल्या टी२० कारकिर्दीच्या अखेरीस चालला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रशीद लतीफ यांनी विराटबाबत एक मोठे वक्तव्य केले.
भारतीय संघ २२ जुलैपासून वनडे आणि टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघांमध्ये २२ जुलै ते २७ जुलै दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. यानंतर ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू होईल. वनडे मालिकेत शिखर धवन तर टी२० मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर विराट कोहली हा दोन्ही संघाचा भाग नसेल. खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याची गच्छंती केल्याचे म्हटले जातेय. परंतु बोर्डाने त्याला विश्रांती दिल्याचे म्हटले. या प्रकरणावर जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटू आपले मत व्यक्त करतायेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रशीद लतीफ यांनीदेखील विराट आणि विराटच्या फॉर्मबाबत आपली प्रतिक्रिया दिली. लतीफ एका यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले,
“भारतात असा सिलेक्टर जन्मालाच आला नाही जो विराट कोहलीला संघातून वगळण्याची हिंमत करू शकेल.”
यामुळे लतीफ यांचा विराटला पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे काही समीक्षकांनी विराटला संघातून वगळण्यात आल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काही नसेल, असे म्हटले.
खराब फॉर्ममधून जातोय विराट
विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीच्या सर्वात वाईट काळातून जात आहे. ७० आंतरराष्ट्रीय शतके नावावर असलेल्या विराटला नोव्हेंबर २०१९ पासून शतक ठोकता आले नाही. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो फक्त १६ धावा करू शकलेला. आधीच्या टी२० मालिकेत आणि एकमेव कसोटीतही त्याच्या बॅटमधून अर्धशतक आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनचा रेकॉर्ड आता मोहम्मद शमी तोडणार, कर्णधार रोहितकडेही विक्रम रचण्याची संधी
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल