Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘सत्तर शतके करणे हे काही कॅंडी क्रश खेळल्यासारखे नाही’, विराटच्या समर्थनार्थ बोलला पाकिस्तानचा दिग्गज

'सत्तर शतके करणे हे काही कॅंडी क्रश खेळल्यासारखे नाही', विराटच्या समर्थनार्थ बोलला पाकिस्तानचा दिग्गज

July 16, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा
Virat Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


आजच्या घडीला कोणत्या खेळाडूने शतक केले किंवा विकेट्स घेतल्या किंवा अप्रतिम झेल घेतला हे नाही तर, विराट कोहलीचा फॉर्म हा विषय क्रिकेटविश्वात ट्रेडिंग होत आहे. यामध्ये भारताच्या आजामाजी खेळाडूंनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर काही खेळाडू अजूनही करत आहेत. त्यातील काहींनी विराटची पाठराखण केली आहे. तर काहींनी टीकास्त्र सोडले आहे. आता यामध्ये बाकी देशांच्या आजीमाजी क्रिकेटपटूंनी उडी घेतली आहे.

विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर सर्वात तिखट प्रतिक्रीया ही भारताचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) याच्यांकडून आली आहे. त्यांनी ‘विराटला संघाबाहेर काढावे’, असे म्हटले होते. यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही समर्थन दर्शविले आहे. मात्र त्याने विराटची पाठराखणही केली आहे.

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिध्द असलेल्या शोएबने त्याच्या युट्युब चॅनेलवर म्हटले, “विराट कोहली हा एक महान खेळाडू आहे. आजच्या काळातील तो सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. मागील १० वर्षांत त्याने अनेकदा चांगली खेळी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र एखाद्या वर्षी त्याची कामगिरी वाईट झाली तर बाकी लोक त्याच्यावर टीका करतात. असे नाही की त्याने धावा केल्या नाही. त्याच्या बॅटमधून फक्त शतक आले नाही ही एकच कमी आहे.”

“कपिल यांचे ते स्वत:चे विधान आहे. त्यांच्या या विधानाला माझे समर्थनही असून त्यांनी काहीही चुकीचे म्हटले नाही. त्यांना त्या प्रकारचे विधान करण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र हा हक्क फक्त त्यांनाच आहे दुसरे कोणीही विराटबद्दल असे विधान करू शकत नाही,” असेही शोएबने पुढे म्हटले आहे.

विराटच्या बाबतीत शोएबने अजून महत्वाचे मत मांडले आहे. तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय स्तरावर ७० शतके करणे हे काही व्हिडिओ गेम खेळण्यासारखे सोपे नाही. सामन्य माणूसही अशी कामगिरी करूच शकत नाही. अशी कामगिरी फक्त एक महान खेळाडूच करू शकतो. विराट जेव्हा त्याच्या लयीत परतला तर तो जगातील एक वेगळाच माणूस असणार आहे.”

भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनीही विराटला साथ दिली आहे.

विराटने कसोटीच्या १०२ सामन्यात ४९.५३च्या सरासरीने ८०७४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २७ शतके आणि २८ अर्धशतके केली आहे. त्याने २६१ वनडे सामन्यात ५७.८७च्या सरासरीने १२३२७ धावा केल्या आहेत. यामध्ये ४३ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५०.१२च्या सरासरीने ३३०८ यामध्ये ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वनडे सामना रविवारी (१७ जुलै) मॅनचेस्टर येथे खेळणार आहे. कदाचित हा सामना विराटचा शेवटचा सामना असणार आहे, कारण तो या सामन्यानंतर एक महिन्याच्या सुट्टीवर जाणार आहे. तसेच त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून वगळले आहे. या दौऱ्यात भारत पाच सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

शेवटच्या वनडेत कशी असणार मॅंचेस्टरची खेळपट्टी? कोणत्या संघाला होणार फायदा? वाचा सर्वकाही

निर्णायक सामन्याची वेळ बदलली, वाचा कधी सुरू होणार इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे

मँचेस्टर वनडेत ‘रोहितसेने’ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत


Next Post
Virat-Kohli

"विराटला वगळणारा सिलेक्टर जन्माला यायचाय"

MS-Dhoni-And-Kapil-Dev

जागतिक क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, ते 'या' पाच भारतीयांनी केलं, विक्रम आजही अबाधित

Virat-Kohli

'काय होईल जर मी पडलो? पण...' आऊट ऑफ फॉर्म विराटचा इंस्टाग्राम पोस्टद्वारे टिकाकारांवर निशाणा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143