भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला टी२० सामना यजमान भारताने ७ विकेट्सने गमावला. यासह भारतीय संघ ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले, दक्षिण आफ्रिकेचे डेविड मिलर आणि रॅस्सी वॅन डर डूसेन. मधळ्या फळीतील या फलंदाजांनी दिल्लीच्या मैदानावर कमालीची फलंदाजी केली. त्या दोघांमध्ये झालेली शतकी भागीदारी संघाच्या विजयास कारणीभूत ठरली.
या सामन्यानंतर मॅच विनर डूसेनने (Rassie Van Der Dussen) आपल्या शानदार खेळीमागचे आणि दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयमागचे कारण स्पष्ट केले आहे. डूसेनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएलला याचे श्रेय दिले आहे.
२९ मे रोजी आयपीएलचा पंधरावा (IPL 2022) हंगाम संपला आहे. जवळपास २ महिने चाललेल्या या आयपीएल हंगामातील सर्व सामने भारतात खेळवले गेले. भारतीय खेळाडूंपासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अशा बऱ्याच संघांचे खेळाडू या हंगामात सहभागी झाले होते, ज्याचा फायदा त्यांना भारतातील मैदानांवर आंतरराष्ट्रीय सामने खेळतानाही होत आहे.
३३ वर्षीय डूसेन (Rassie Van Der Dussen Credits IPL) म्हणाला की, “मी आयपीएलचे बरेचसे सामने पाहिले आहेत. मला प्रत्यक्षात मैदानात उतरून खेळण्याची फार कमी संधी मिळाली. परंतु भारतातील मैदानांवर गोलंदाज कुठे चेंडू फेकतील?, फलंदाजांसाठी येथील मैदानांची परिस्थिती कशी असते?, याची मला चांगलीच कल्पना आहे.”
“मी आयपीएलमुळे २ महिने भारतात घालवले आहेत. येथील ऊन्हाचा, येथील वेगवेगळ्या परिस्थितींचा मी अनुभव घेतला आहे. म्हणून मी येथील परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. फक्त मलाच नव्हे तर सर्वांना ही गोष्ट लागू होते. यंदा आमच्या संघातील बऱ्याचशा खेळाडूंनी आयपीएल खेळली आहे, ज्याची मदत आम्हाला पहिल्या सामन्यात झाली. आम्ही लवकरच येथील स्थितींशी जुळवून घेतले आणि पहिल्या सामन्यात धुव्वादार प्रदर्शन केले,” असेही पुढे डूसेनने म्हटले.
दरम्यान डूसेनने आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून केवळ ३ सामने खेळले होते. या तिन्ही सामन्यांमध्ये त्याला प्रभावी प्रदर्शन करता आले नव्हते. परंतु भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून त्याने सर्वाधिक ७५ धावा केल्या आहेत. ४६ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ही मॅच विनिंग खेळी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकमेकींची केसं ओढली, दुसऱ्या सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी महिलांची तुंबळ हाणामारी, Video तुफान Viral
मिलरची भारताविरुद्ध ‘किलर’ खेळी, सामनावीर बनत ‘मिस्टर ३६० डिग्री’चा मोठा विक्रम काढला मोडित
पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिलेला डेविड मिलर सगळ्यांनाच पुरून उरला