ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर) रात्री निधन झालं. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते.
रतन टाटा यांच्या जाण्यानं क्रिकेट विश्वात देखील शोककळा पसरली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. टाटा यांनी ज्याप्रकारे देशाच्या उद्योग विकासात योगदान दिलं, त्याचप्रमाणे त्यांनी देशातील क्रिकेटच्या विकासात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचं भविष्य सावरण्यामागे रतन टाटा यांचा हात होता. या बातमीत आम्ही तुम्हाला रतन टाटा यांच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल माहिती देणार आहोत.
रतन टाटा यांच्या वेळी टाटा समूहातील अनेक कंपन्यांनी भारतीय क्रिकेटपटूंची मदत केली आहे. टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी क्रिकेटपटूंना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी त्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. रतन टाटा यांची ही मदत अनेक क्रिकेटपटूंसाठी वरदान ठरली. यामध्ये अशा क्रिकेटपटूंचा देखील सहभाग आहे, ज्यांनी पुढे जाऊन भारतासाठी विश्वचषक जिंकला.
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांना रतन टाटा यांनी भरपूर मदत केली होती. अमरनाथ यांना टाटा ग्रुपच्या एयर इंडिया कंपनीनं मदत केली होती. त्यांना एअर इंडियाकडून वेतन मिळत होतं. मोहिंदर अमरनाथ भारताच्या 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते.
याशिवाय टाटा ग्रुपनं संजय मांजरेकर, जगवाल श्रीनाथ, रॉबिन उथप्पा, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ सारख्या खेळाडूंना मदत केली होती. हे सर्व क्रिकेटपटू टाटा ग्रुपच्या इकोसिस्टिमचे भाग होते. टीम इंडियाचे सध्याचे निवडकर्ते अजित आगरकर यांना देखील टाटा स्टीलनं खूप मदत केली आहे. आगरकर भारताच्या 2007 टी20 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते.
हेही वाचा –
एकाच डावात दोन द्विशतके, 400+ भागीदारी; जो रूट-हॅरी ब्रूक यांच्याडून अनेक रेकाॅर्ड मोडीत
ind vs ban; हार्दिक पांड्या बिबट्याच्या वेगाने धावून घेतला अशक्यप्राय झेल, पाहा VIDEO
PAK vs ENG; जो रूट मुलतानचा नवा सुलतान, पाकिस्तानविरुद्ध दणदणीत द्विशतकी खेळी