परभणी पांचाला प्राईड विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात झालेला रेलीगेशन फेरीतील सामना अंत्यत चुरशीचा झाला. दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देताना दिसत होते. कधी परभणी तर कधी रत्नागिरी संघ पुढे जात होतं. रत्नागिरी कडून साहिल माने, श्रेयस शिंदे चतुरस्त्र खेळ करत होते. तर परभणी कडून प्रसाद रुद्राक्ष आक्रमक खेळ करत होता.
मध्यांतराला परभणी संघाकडे 22-20 अशी आघाडी होती. तर शेवटच्या दहा मिनिटं शिल्लक असताना
32-32 असा सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर प्रत्येक चढाईत नंतर दोन्ही संघाकडे आलटून पालटून आघाडी येत होती. शेवटचे काही मिनिटं शिल्लक असताना रत्नागिरी ने परभणी वर लोन पडत आघाडी मिळवली व ती कायम ठेवत सामना 50-47 असा जिंकला.
रत्नागिरी कडून चढाईत साहिल शिंदे ने 19 गुण व श्रेयस शिंदे ने 11 गुण मिळवले. तर संजोग लाले ने 4 पकडी करत महत्वपूर्ण योगदान दिले. परभणी कडून प्रसाद रुद्राक्ष ने 23 गुणांची खेळी पण मात्र तो संघाल विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. तर परभणी कडून हनुमान पोळे ने 5 पकडी केल्या. (Ratnagiri Aravalli Arrows third win in the relegation round)
बेस्ट रेडर- प्रसाद रुद्राक्ष, परभणी पांचाला प्राईड
बेस्ट डिफेंडर्स- हनुमान पोळे, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- साहिल माने, रत्नागिरी अरावली ॲरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझं नाव सिमरन…’, विजयानंतर ड्रेसिंग रूममध्येही चमकला हेटमायर; मजा-मस्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
पालघर काझीरंगा रहिनोसचा रेलीगेशन फेरीत तिसरा विजय






