---Advertisement---

BREAKING: रत्नागिरी जेट्सने उंचावली MPL 2023 ची ट्रॉफी! कोल्हापूर टस्कर्सच्या पदरी निराशा

On: शुक्रवार, जून 30, 2023 4:25 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (30 जून) पार पडला. रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर टस्कर्स यांच्यातील हा सामना नियोजित वेळेनुसार गुरुवारी होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे नाणेफेक देखील न झाल्याने सामना राखीव दिवशी शुक्रवारी खेळला गेला. शुक्रवारी देखील प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूरच्या डावात पावसाने व्यत्यय आणला. हा सामना पूर्ण होऊ न शकल्याने, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला विजयी घोषित करण्यात आले.

https://www.instagram.com/p/CuHIz95oy6q/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

गुरुवारी खेळ न झाल्याने हा सामना शुक्रवारी खेळण्याचे निश्चित झाले होते. शुक्रवारी रत्नागिरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. प्रदीप धाडे व कुणाल थोरात या गोलंदाजांनी कोल्हापूरचे आघाडीचे फलंदाज झटपट तंबूत पाठवले. अनुभवी अंकित बावणे, साहिल औताडे, नौशाद शेख व सिद्धार्थ म्हात्रे फारसे योगदान देऊ शकले नाहीत. कर्णधार केदार जाधव याने 30 धावांची खेळी केली. कोल्हापूर संघाने 16 षटकात 8 बाद 80 धावा केल्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यानंतर जवळपास तीन तासांचा वेळ वाया गेल्यानंतर रत्नागिरी संघाला विजयी घोषित केले गेले.

विजेत्या रत्नागिरी संघाला 50 लाख रुपये बक्षीस देण्यात आले. तर उपविजेत्या कोल्हापूर संघाला 25 लाख रुपये मिळाले. ऑरेंज कॅप कोल्हापूरच्या अंकित बावणे याने आपल्या नावे केली. तर, पर्पल कॅप पुणेरी बाप्पा संघाच्या सचिन भोसले याने जिंकली.

(Ratnagiri Jets Won MPL 2023 Beat Kolhapur Tuskers)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---