पुणे (7 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या तिसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना रायगड विरुद्ध रत्नागिरी या दोन संघाच्या मध्ये झाला. रायगड संघाने सुरुवातीच्या मिनिटामध्ये रायगड संघाने गुण मिळवत 5-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर रत्नागिरीच्या श्रेयस शिंदे ने पहिला 1 गुण मिळवत आपल्या संघाचा खात उघडला तर पुढील चढाईत सुपर रेड करत सामन्यात चुरस आणली.
अमरसिंग कश्यप ने चढाईत गुण मिळवत तर निलेश शिंदे व श्रीपाद कुंभार यांनी पकडीत गुण मिळवत रत्नागिरी संघाला आघाडी मिळून दिली. मध्यंतरा रत्नागिरी संघाने 15-12 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर मात्र दोन्ही संघांनी सावध खेळ केला. निखिल शिर्केच्या सुपर रेड ने सामना 16-16 असा बरोबरीत आणला. अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली कधी रत्नागिरी तर कधी रायगड संघ आघाडी घेत होता.
सामन्याची शेवटची 9 मिनिट शिल्लक असताना 23-23 असा सामना सुरू होता. त्यानंतर रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यपच्या सुपर टेन ने आघाडी मिळून दिली. रत्नागिरी संघाने 7 मिनिट शिल्लक असताना रायगड संघाला ऑल केला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत रत्नागिरी संघाने 36-31 अशी बाजी मारत गुणतालिलेत दुसऱ्या क्रमांकवर झेप घेतली. रत्नागिरी कडून श्रेयस शिंदे अष्टपैलू खेळी केली.
बेस्ट रेडर- प्रशांत जाधव, रायगड
बेस्ट डिफेंडर- वेद पाटील, रत्नागिरी
कबड्डी का कमाल- श्रेयस शिंदे, रायगड