पुणे (22 मार्च 2024) – आजचा तिसरा सामना रत्नागिरी विरुद्ध बीड यांच्यात झाला. प्रमोशन फेरीत रत्नागिरी जिल्हाने 3 पैकी 1 सामना जिंकला होता तर बीड ने तिन्ही सामने गमावले होते. सुरुवातीच्या चार मिनिटाच्या खेळानंतर बीड ने 4-1अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर रत्नागिरीच्या खेळाडूंनी आपला आक्रमक खेळ करत पटलावर केला. अमरसिंग कश्यप ने चढाईत चपळाई गुण मिळवत सामन्यात आघाडी मिळवली.
रत्नागिरी संघाने मध्यंतराला 18-08 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. रत्नागिरीच्या बचावपटूंनी उत्कृष्ट खेळ दाखवत बीडच्या चढाईपटूंना अक्षरशः हतबल केले होते. मध्यंतरा नंत बीडच्या रियाज शेख ने चढाईत तर आकाश राठोड ने पकडीत चांगला खेळ करत सामन्यात चुरस आणली होती. मात्र रत्नागिरी संघाच्या बचावपटूंनी सांघिक खेळ दाखवत सामन्यावर पकड मजबूत केली होती.
रत्नागिरी संघाने 34-23 असा महत्वपूर्ण विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. रत्नागिरी कडून अमरसिंग कश्यपने चढाईत 8 गुण मिळवले. अभिषेक शिंदे ने अष्टपैलू खेळ केला. श्रेयस शिंदे व निलेश शिंदे यांनी प्रत्येकी 4 पकडीत गुण मिळवले. आविष्कार पालकर ने पकडीत 3 व वेद पाटील ने पकडीत 2 गुण मिळवले. बीड कडून रियाज शेख ने चढाईत 6 तर आकाश राठोड ने पकडीत एकूण 5 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अमरसिंग कश्यप, रत्नागिरी
बेस्ट डिफेंडर- आकाश राठोड, बीड
कबड्डी का कमाल- निलेश शिंदे, रत्नागिरी
महत्वाच्या बातम्या –
CSKvsRCB । धोनीने पुन्हा दाखवली यष्टीपाठी जादू, शेवटच्या चेंडूवर महत्वाचा फलंदाज धावबाद
प्रमोशन फेरीत पालघर संघाचा तिसरा विजय, तर मुंबई शहराचा चौथा पराभव