पुणे (22 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना नंदुरबार विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. कोल्हापूर संघाने प्रमोशन फेरीत 3 सामने जिंकले होते तर नंदुरबार संघाने 3 पैकी 1 सामना जिंकला होता. दोन्ही संघांनी अत्यंत सावध सुरुवात केली. 3 मिनिटाच्या खेळानंतर सामना 2-2 असा बरोबरीत सुरू होता. त्यानंतर नंदुरबार संघाने आपल्या डू और डाय रेड मध्ये बोनस गुण मिळवला तर कोल्हापूरच्या डू और डाय रेड मध्ये ओमकार पाटीलची पकड करत गुण मिळवत नंदुरबार संघाने 4-2 अशी आघाडी घेतली होती.
कोल्हापूरच्या सौरभ फगारे व ओमकार पाटील ने चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 10-04 अशी आघाडी मिळवली. मध्यंतराला कोल्हापूर संघाने 16-08 अशी आघाडी मिळवली होती. कोल्हापूर कडून सौरभ फगारे व ओमकार पाटील यांनी चढाईत गुण मिळवत कोल्हापूर संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. नंदुरबार संघाचे खेळाडू गुण मिळवण्यात अपयशी ठरत होते. 29 मिनिटाच्या खेळात केवळ जयेश महाजन व वरून खंडले या दोन खेळाडूंनी नंदुरबार संघासाठी गुण मिळवले होते.
सामन्याची शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना कोल्हापूर संघाकडे 24-13 अशी आघाडी होती. त्यानंतर सामना अत्यंत चुरशीचा झाला. नंदुरबार संघाने शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना कोल्हापूर संघाला ऑल आऊट सामन्यात चुरस आणली होती. मात्र कोल्हापूर संघाने अटीतटीच्यालढतीत 29-25 अशी बाजी मारली. कोल्हापूर कडून सौरभ फगारे ने चढाईत 9 गुण मिळवले तर ओमकार पाटील ने चढाईत 7 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर नंदुरबारच्या जयेश महाजन ने अष्टपैलू खेळ करत सामन्यात रंगत आणली होती. (Kolhapur team’s victory in the promotion round)
बेस्ट रेडर- जयेश महाजन, नंदुरबार
बेस्ट डिफेंडर- जयेश महाजन, नंदुरबार
कबड्डी का कमाल – सौरभ फगारे, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
IPL च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि दिल्ली आमने-सामने, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
IPL 2024 । धोनी आता खऱ्या अर्थाने बनला महान विकेटकिपर! कुमार संगकाराला टाकले मागे