एमएस धोनी कदाचित आपला शेवटचा आयपीएल हंगाम यावर्षी खेळत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024साठी सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या भविष्याचा विचार करून कर्णधार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (22 मार्च) आयपीएल 2024ची सुरुवात सीएसके विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. धोनी या सामन्यात ऋतुराजच्या नेतृत्वात खेळला असून एक मोठा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
एमएस धोनी (MS Dhoni) याने कर्णधारपद सोडल्यानंतर शुक्रवारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वात पहिला आयपीएल सामना खेळला. धोनी सध्या 42 वर्षांचा असून चॅपॉकमध्ये शुक्रवारी विकेटकिपिंगसाठी स्टंप्सच्या मागे उभा राहताच त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. टी-20 क्रिकेटमध्ये धोनी आता यष्टीरक्षकाची भूमिका बजावणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या नावावर होता. धोनीचे वय शुक्रवारी 42वर्ष आणि 239 दिवस होते. तर संगकाराने यष्टीरक्षक म्हणून आपला शेवटचा सामना 42 वर्ष आणि 115 दिवस वय असताना केले होते.
टी-20 क्रिकेटमधील सर्वात वयस्कर यष्टीरक्षक
42 वर्ष 259 दिवस – एमएस धोनी (सीएसके, 2024)
42 वर्ष 115 दिवस – कुमार संगकारा (एमसीसी, 2020)
41 वर्ष 287 दिवस – जलत खान (हिंदुकुश, 2022)
41 वर्ष 255 दिवस – इरविंग रॉजर्स विरुद्ध (अँगुइला, 2006)
41 वर्ष 183 दिवस – ऍडम गिलक्रिस्ट (पंजाब किंग्ज, 2013)
उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर आरसीबीने नाणेफेक जिंकून सीएसकेला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 6 विकेट्सच्या नुकसानावर 173 धावांपर्यंत मजल मारली. सीएसकेला होम ग्राउंड चेपॉकवर हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी 174 धावांचे लक्ष्य मिळाले. (MS Dhoni has become the oldest wicket-keeper in T20 cricket)
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग 11 :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे,समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, दीपक चहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान.
रॉयल चॅलेंजर बंगळुरू प्लेइंग 11 :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, ठरला सर्वात फास्ट 12 हजार धावा करणारा फलंदाज
मिचेल स्टार्कबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, म्हणाला,”आयपीएल 2024 मध्ये तो घेणार इतक्या विकेट्स…