---Advertisement---

IPL च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि दिल्ली आमने-सामने, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

---Advertisement---

आयपीएलच्या 17व्या हंगामात दुसरा सामना हा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. तसेच हा सामना 23 मार्च रोजी मोहालीच्या महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात हा सामना असणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तसेच पंजाब किंग्सची धुरा शिखर धवनच्या हाती, तर दिल्ली कॅपिटल्सची धुरा ऋषभ पंतच्या हाती असणार आहे. अपघातात झालेल्या दुखापतीतून 14 महिन्यांनी बरा होऊन ऋषभ पंत मैदानात परतत आहे. तसेच आज आपण दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

याबरोबरच पंजाब किंग्सची धुरा शिखर धवनच्या हाती, तर दिल्ली कॅपिटल्सची धुरा ऋषभ पंतच्या हाती असणार आहे. अपघातात झालेल्या दुखापतीतून 14 महिन्यांनी बरा होऊन ऋषभ पंत मैदानात परतत आहे. त्याच्याकडून दिल्ली कॅपिटल्सला खूप अपेक्षा आहेत. मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सची स्थिती एकदम बिकट राहिली आहे. तर दुसरीकडे, कॅप्टन्स ग्रुप फोटोत शिखर धवन नसल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

अशातच रणजी ट्रॉफीत तसं पाहिलं तर पृथ्वी शॉची बॅट हवी तशी चालली नाही. दुसरीकडे, 14 महिन्यानंतर परतलेल्या ऋषभ पंतकडून किती अपेक्षा ठेवणार हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे विकेटकीपर बॅटर म्हणून जितेश शर्मा आणि अभिषेक पोरेल उजवे ठरतील. तर फलंदाजीत पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्याकडून अपेक्षा आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे-

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, ऋषी धवन/ हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, ललित यादव, कुमार कुशाग्रा/अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---