आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आजपासून सुरवात झाली असून विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड केला आहे. तसेच हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणालाच जमलेला नाही. याबरोबरच विराट कोहली हा बराच काळ क्रिकेटपासून लांब होता. भारताच्या संघात तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही नव्हता. पण आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात उतरल्यावर कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
याबरोबरच पहिल्या सामन्यात कोहली जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याला जास्त चेंडू खेळायला मिळत नव्हते. कारण त्यावेळी आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस हा चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता. त्यामुळे जेव्हा आरसीबी चार षटके सामना खेळला होता, तेव्हा कोहलीच्या वाट्याला फक्त चार चेंडूंच आले होते.
अशातच टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच विराट कोहलीला आज सामना सुरू होण्यापूर्वी टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करण्यासाठी फक्त 6 धावांची गरज होती. याआधी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि फ्रेंचायसी लीगमध्ये 11994 धावा केल्या आहेत. तर आतापर्यंत 5 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.
Fastest to 12,000 runs in T20s:
Chris Gayle – 345
Virat Kohli – 360*
David Warner – 369
Alex Hales – 432
Shoaib Malik – 451#IPL2024— Cricket.com (@weRcricket) March 22, 2024
दरम्यान, विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकले आहेत. आयपीएलच्या 237 सामन्यात 7 शतकं नावावर केली आहेत. तसेच एकाच पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 2016 मध्ये त्याने 973 धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी दोन्हीं संघाची प्लेइंग 11 :-
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग 11 :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे,समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, दीपक चहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान.
रॉयल चॅलेंजर बंगळुरू प्लेइंग 11 :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- मिचेल स्टार्कबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, म्हणाला,”आयपीएल 2024 मध्ये तो घेणार इतक्या विकेट्स…
- आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11