क्रिकेटटॉप बातम्या

मुस्तफिजुरच्या 4 विकेट्सनंतर आरसीबीची 173 धावांपर्यंत मजल, शेवटच्या षटकांमध्ये रावत-कार्तिकच्या धावांचा पाऊस

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात इंडियन प्रीमियर लीग 2024चा पहिला सामना खेळला गेला. शुक्रवारी (22 मार्च) आयपीएलचा 17वा हंगाम आरसीबी आणि सीएसके संघाने केला. चेन्नईच्या चॅपॉक स्टेडियमवर आरसीबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 173 धावांपर्यंत मजल मारली. यजमान सीएसकेला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य मिळाले.

शेवटच्या षटकांमध्ये अनुज रावत (Anuj Rawat) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्या फटकेबाजीमुळे या धावा होऊ शकल्या. दुसऱ्या बाजूला सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याने 4 षटकात 29 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. दीपक चाहर याला 4 षटकात 37 धावा खर्च केल्यानंतर 1 विकेट मिळाली. आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेलिस 35, विराट कोहली 21, कॅमरून ग्रीन 18 धावा करून बाद झाले. पण मध्यक्रमातील रजत पाटिदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शुन्यावर विकेट्स गमावल्या.

पण पाचव्या क्रमांकावर आलेला अनुज रावत याने 25 चेंडूत 48 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच अनुभवी दिनेश कार्तिक याने 25 चेंडूत 38* धावांपर्यंतच मजल मारली. (Chennai Super Kings require 174 to win the first game of IPL 2024)

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग 11 :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे,समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, दीपक चहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान.

रॉयल चॅलेंजर बंगळुरू प्लेइंग 11 :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.

महत्वाच्या बातम्या – 
IPL ओपनिंग सेरेमनीमध्ये अक्षय-टायगरचा जलवा, रहमान-मोहितनेही गाजवलं चॅपॉक स्टेडियम
मिचेल स्टार्कबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, म्हणाला,”आयपीएल 2024 मध्ये तो घेणार इतक्या विकेट्स…

Related Articles