---Advertisement---

राजकोट कसोटीत अश्विन अन्नाचा महाविक्रम! ठरला ‘ही’ मोठी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय

On: शुक्रवार, फेब्रुवारी 16, 2024 3:59 PM
Ravichandran Ashwin
---Advertisement---

रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा महान गोलंदाज आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) देखील अश्विनने इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीत एक महाविक्रम नावावर केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. उभय संघांतील हा तिसरा कसोटी सामना गुरुवारी (15 फेब्रुवारी) रोजी सुरू झाला.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने राजकोट कसोटीत आपली पहिली विकेट सलामीवीर झॅक क्रॉली (Zak Crawley) याच्या रुपात घेतली. क्रॉली वैयक्तिक 15 धावा करून तंबूत परतला. दुसरीकडे अश्विनने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 500 विकेट्स पूर्ण केल्या. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा अश्विन केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी ही कामगिरी माजी दिग्गज अनिल कुंबळे यांच्या नावावर होती.

रविचंद्रन अश्विनआधी अनिल कुंबळे यांनीही भारतासाठी 500 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेंच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट्सची नोंद आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.

महत्वाच्या बातम्या – 
सरफराजच्या कसोटी पदार्पणासाठी मैदानात आलेली ‘ती’ त्याची आई की पत्नी? जाणून घ्या नाव-गाव आणि सर्वकाही
IND vs ENG 3rd Test : भारताने पहिल्या डावात केल्या 445 धावा, पदार्पण सामन्यात ध्रुव जुरेलचे अर्धशतक हुकले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---