जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखली जाणारी ऍशेस मालिका नुकतीच समाप्त झाली. इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत समाप्त झाली. मालिकेतील तीनच सामने खेळणाऱ्या इंग्लंडच्या ख्रिस वोक्स याला इंग्लंडचा मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्याच्या या कामगिरीनंतर भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने त्याचे कौतुक केले आहे.
वोक्सच्या अष्टपैलू खेळामुळे इंग्लंड ही मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरलेला. वोक्सचे कौतुक करताना अश्विन म्हणाला,
“जेव्हा मी ख्रिस वोक्सला खेळताना पाहतो तेव्हा मला जेलसी होते. तो खेळाला अत्यंत सोपे बनवतो. तो मला एक नैसर्गिक ऍथलिट वाटतो. तो इतर कोणत्या देशात जन्मला असता आणि त्याला दुखापती नसत्या तर तो प्रत्येक प्लेइंग इलेव्हनचा भाग असता.”
वोक्स याला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी इंग्लंड संघात संधी मिळाली नव्हती. या दोन्ही सामन्यात इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने संघात पुनरागमन करताच इंग्लंडचे नशीब बदलले. त्याने कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी तीन बळी मिळवत तसेच दुसऱ्या डावात नाबाद 32 धावांची खेळी करत इंग्लंडला विजयी केले. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात एक बळी मिळवला. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ न झाल्याने इंग्लंड या सामन्यात विजयापासून वंचित राहिला. त्यानंतर अखेरच्या कसोटीत देखील त्याने एकूण 7 बळी घेत इंग्लंडच्या विजयात हातभार लावला. मालिकेत 83 धावा 19 बळी मिळवल्याने त्याला इंग्लंडसाठी मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
(Ravi Ashwin Praised Chris Woakes After Ashes Performance)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी