भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सलग दुसरा टी20 सामना पराभूत झाला. यजमान वेस्ट इंडिजने 5 टी20 सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारत संघाच्या या निराशाजनक कामगिरीमुळे क्रिकेट चाहते नाराज होऊन प्रतिक्रिया देत आहे. सोबतच भारतीय संघाचे अनेक माजी खेळाडू संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देत आहेत. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे.
गयाना येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ अतिशय खराब पद्धतीने पराभूत झाला. फलंदाजांनी पुरेशा धावा धावफलकावर लावल्या नव्हत्या. त्यानंतर निकोलस पुरन याने केलेल्या हल्ल्यातून भारतीय गोलंदाज वाचू शकले नाहीत अखेरच्या काही षटकात चहल व बिश्नोई यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तरीदेखील ते भारताचा पराभव टाळू शकले नाहीत.
भारतीय संघाने या सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेल याला देखील संधी दिलेली. पहिल्या सामन्यात देखील तो संघाचा भाग होता. मात्र, दोन्ही सामन्यात त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. यामुळेच चोप्रा याने म्हटले,
“अक्षर याला तुम्ही एकही षटक गोलंदाजी दिली नाही. समोरच्या संघातील डावखुरे फलंदाज पाहून तुम्ही हा निर्णय घेतला असेल तर, तुम्ही अक्षरला संघात संधी का दिली? त्या जागी एक अतिरिक्त फलंदाज खेळवता आला असता. तुम्ही सहाव्या गोलंदाजाचा उपयोगच केला नाही.”
या सामन्यात चहल व बिश्नोई यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच, वेस्ट इंडिजसाठी अकिल होसेन याने देखील आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले.
(Aakash Chopra Criticized Team India Management For Not Using Axar Patel As Bowler)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी