वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस पावसामुळे रद्द झाला. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला, पण मालिका भारताने जिंकली. हा भारताचा वर्षातील शेवटून दुसरा कसोटी सामना होता. कारण वर्षातील शेवटचा सामना संघाला डिसेंबर महिन्याच्या आठवड्यात खेळेल. दरम्यानच्या पाच महिन्यांमध्ये चाहत्यांना भारतीय खेळाडू कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत.
कसोटी क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही बाब चिंतेची आहे. पण आशिया चषक आणि वनडे विश्वचषकामुळे मनोरंजनाची कुठलीच कमी नसेल. भारतीय संघ (Team india) डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका (SA vs IND) दौऱ्यावर जाणार आहे. याठिकाणी संघाला टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळायच्या आहेत. कसोटी मालिका सर्वात शेवटची म्हणजेच 26 डिसेंबर रोजी सुरू होईल. यादिवशी खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ असेही म्हटले जाते.
वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा सामना 24 जुलै रोजी संपला, तर भारताला आपला पुढचा सामना 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंचुरीयनमध्ये खेळायचा आहे. म्हणजेच या दोन सामन्यांमध्ये पाच महिन्यांचे अंतर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीचा भाग असणार आहे. उभय संघांतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारी 2024 रोजी सुरू होईल. केपटाउनमध्ये हा दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल.
दरम्यानच्या पाच महिन्यांमध्ये संघ कोणत्या मालिका खेळणार?
भारतीय संघाच्या दृष्टीने तीन महत्वाच्या स्पर्धा दरम्यानच्या पाच महिन्यात खेळायच्या आहेत. यात एक आशिया चषक, दुसरा आशियाई गेम्स आणि तिसरा वनडे विश्वचषक आहे. आशिया चषक श्रीलंकेत आयोजित केला जाणार आहे, तर आशियाई गेम्स चीनमध्ये पार पडतील. वनडे विश्वचषकाचे यजमानपद मात्र स्वतः भारतीय संघ बजावणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. (Indian team will be seen in white jersey after five months! Know the schedule)
महत्वाच्या बातम्या –
देवधर ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी पश्चिम विभाग-दक्षिण विभागाचे दणदणीत विजय, रिंकू चमकला
रोहितकडून विराटवर स्तुतीसुमने! म्हणाला, “संघात त्याच्यासारखा खेळाडू हवाच”