वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे सोमवारी (24 जुलै) समाप्त झाला. अखेरच्या दिवशी पडलेला संततधार पाऊस व यामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य न राहिल्याने सामना अनिर्णित संपवण्यात आला. यासह भारतीय संघाने ही मालिका 1-0 अशी जिंकली. या सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याचे विशेष कौतुक केले.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी आठ बळींची आवश्यकता होती. मात्र, पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना रोहित म्हणाला,
“कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला विराट सारख्या खेळाडूची आवश्यकता पडते. कारण, डाव कसा उभा करायचा हे त्याला चांगले माहित आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचे खेळाडू हवे असतात. फलंदाजीत खोली आणि वेगवेगळे पर्याय संघाला मजबूत बनवतात. एक चांगला संघ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
विराटने या सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे 76 वे शतक होते. बाद होण्यापूर्वी त्याने 206 चेंडूवर 11 चौकारांच्या मदतीने 121 धावा केलेल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ मोठे धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेला.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 438 पर्यंत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने 255 धावा केल्या. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 182 धावा करून डाव घोषित करत वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे लक्ष ठेवलेले. मात्र, अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ न होऊ शकल्याने सामना अनिर्णीत राहिला.
(Rohit Sharma Praised Virat Kohli For His Century In Trinidad Test)
महत्वाच्या बातम्या –
पावसाने हुकला टीम इंडियाचा क्लीन स्वीप! त्रिनिदाद कसोटी अनिर्णित, भारताचा 1-0 ने मालिकाविजय
BREAKING: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची निवृत्ती, 30 व्या वर्षीच घेतला निर्णय