वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे सोमवारी (24 जुलै) समाप्त झाला. अखेरच्या दिवशी पडलैला पाऊस व यामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य न राहिल्याने सामना अनिर्णित संपवण्यात आला. यासह भारतीय संघाने ही मालिका 1-0 अशी जिंकली. या मालिका विजयासोबतच भारताने मागील 21 वर्षापासून वेस्ट इंडीजमध्ये कसोटी पराभव न पाहण्याचा इतिहास कायम ठेवला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी आठ बळींची आवश्यकता होती. मात्र, पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. भारत ही मालिका क्लीन स्वीप करू शकला नसला तरी मागील तब्बल 21 वर्षांपासून वेस्ट इंडिजच्या भूमीवर पराभूत न होण्याची कामगिरी त्यांनी कायम ठेवली.
भारतीय संघाला वेस्ट इंडीजमध्ये अखेरचा कसोटी पराभव 2002 मध्ये पाहायला मिळाला होता. त्यानंतर आजतागायत भारतीय संघाने या ठिकाणी एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये 2006, 2011, 2016, 2019 व आता 2023 अशा सलग पाच मालिकांमध्ये विजय नोंदवला. यासोबतच भारताने मायदेशात देखील वेस्ट इंडीजला सलग चार मालिकांमध्ये धूळ चारली आहे. या 21 वर्षांमध्ये भारताने पंधरा कसोटी विजय मिळवले तर दहा सामने अनिर्णित राहिले आहेत. विशेष म्हणजे, 1975 ते 2002 या कालावधीत भारतीय संघाला वेस्ट इंडीजमध्ये एकदाही कसोटी मालिका विजय साजरा करता आला नव्हता.
या मालिकेचा विचार केल्यास भारतीय संघाने डॉमिनिका येथे झालेल्या पहिल्या सामन्यात केवळ तीन दिवसांमध्ये विजय संपादन केलेला. त्रिनिदाद कसोटीत देखील भारतीय संघाचे पारडे चौथ्या दिवसाखेर जड होते. मात्र, अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ न शकल्याने भारताची 2-0 अशा विजयाची संधी हुकली.
(India Never Lost Test In West Indies Since 2002 Now Win Series 1-0)
महत्वाच्या बातम्या –
पावसाने हुकला टीम इंडियाचा क्लीन स्वीप! त्रिनिदाद कसोटी अनिर्णित, भारताचा 1-0 ने मालिकाविजय
BREAKING: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची निवृत्ती, 30 व्या वर्षीच घेतला निर्णय