वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही. पाचव्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना अनिर्णित राहिला. हा सामना अनिर्णित राहिल्याने, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलमध्ये भारतीय संघाला मात्र नुकसान सहन करावे लागले. तर पाकिस्तान संघाला याचा फायदा झाला.
भारतीय संघाला मालिकेतील सलग दुसरा विजय साजरा करण्याची चांगली संधी होती. अखेरच्या दिवशी केवळ आठ बळींची आवश्यकता असताना पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला. त्यामुळे डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण विभागून देण्यात आले. मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने भारतीय संघाला 12 गुण प्राप्त झाले होते. त्यानंतर आता हे चार गुण असे सोळा गुण घेऊन भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा चार गुण कमी म्हणजे बारा गुण असताना देखील पाकिस्तान संघ मात्र केवळ विजयाच्या सरासरीमुळे अव्वलस्थानी दिसून येतो. पाकिस्तानने सायकलमध्ये केवळ एक सामना खेळला असून, त्यांनी त्यातही विजय मिळवल्यामुळे त्यांची विजयाची सरासरी शंभर टक्के आहे.
या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने चार सामने खेळताना 26 गुण व 54.17 अशा विजयी सरासरीसह तिसरे स्थान राखले आहे. तर तितकेच सामने खेळून इंग्लंडने 14 गुणांसह चौथ्या स्थानावर कब्जा केला आहे. पाचव्या स्थानी असलेल्या वेस्ट इंडीजकडे 4 गुण आहेत. तर आपला पहिला सामना पराभूत झालेल्या श्रीलंकेकडे एकही गुण नाही. या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व बांगलादेश यांनी या सायकलमध्ये अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
(India Slips Number 2 WTC Points Table Pakistan Tops)
महत्वाच्या बातम्या –
पावसाने हुकला टीम इंडियाचा क्लीन स्वीप! त्रिनिदाद कसोटी अनिर्णित, भारताचा 1-0 ने मालिकाविजय
BREAKING: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची निवृत्ती, 30 व्या वर्षीच घेतला निर्णय