नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती पाच टी-20 सामन्यांची मालिका पार पडली. यजमान भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशा फरकाने नावावर केली. रवी बिश्नोई याचे प्रदर्शन संघाच्या विजयासाठी महत्वाचे ठरले. या प्रदर्शनासाठी बिश्नोईला मालिकावीर पुरस्कार दिला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या ताच्या क्रमवारीत बिश्नोईने मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळाले.
बुधवारी (6 डिसेंबर) जाहीर होणाऱ्या आयसीसी क्रमवारीत रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याला मोठा फायदा मिळाल्याचे दिसते. टी-20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) बिश्नोई सर्वोत्तम गोलंदाज बनला अशून यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान याला मागे टाकत बिश्नोईने ही बादशाहत मिळवली. 699 रेटिंग पॉइंट्सह त्याने ही जागा काबीज केली आहे. दुसरीकडे राशिद खान 692 रेटिंग पॉइंट्ससह टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत बिश्नोईने 9 विकेट्स घेतल्या असून भारतासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली होती. याच प्रदर्शनाचा फायदा क्रमवारीतून फिरकीपटू गोलंदाजाला मिळाला.
बिश्नोईने क्रमवारीत आघाडी घेतल्यानंतर राशिद खानसह वानिंदू सहरंगा (679), आदिल राशीद (679), आणि महेश थिक्षणा (677) यांना प्रत्येकजण एक-एक स्थानाने खाली घसरला आहे. भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल यानेही 16 स्थानांची झेप घेत टी-20 गोलंदाजांच्या यादीत 11वा क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेलला 6 विकेट्स मिळाल्या होत्या. या प्रदर्शनाचा फायदा फिरकीपटूने आयसीसी क्रमवारीच्या रुपात मिळवला.
RAVI BISHNOI BECOMES THE NO.1 RANKED T20I BOWLER…!!! ???????? pic.twitter.com/HYkgELQN5s
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2023
फलंदाजांचा विचार केला, तर युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने टी-20 फलंदाजांमध्ये 16 स्थानांची आघाडी घेत 19व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या त्याच्याकडे 581 रेटिंग पॉइंट्स आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 138 धावा केल्या होत्या. तसेच जयस्वालचा सहकाही ऋतुराज सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 688 रेटिंग पाइंट्ससह ऋतुराजने ही आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलामीवीर फलंदाजाने 223 धावाचे योगदान भारतीय संघासाठी दिले होते. सूर्यकुमार यादव (855 रेटिंग पॉइंट्स) पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्यानंतर मोहम्मद रिझवान (787) दुसऱ्या, तर ऍडम मार्करम (756) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बाबर आझम (734) चौथ्या क्रमांकापर्यंत खाली आला आहे. (Ravi Bishnoi has become the number one T20 bowler in the ICC rankings)
महत्वाच्या बातम्या –
6 डिसेंबरचा जन्म असलेल्या 11 तगड्या क्रिकेटपटूंची ’बर्थडे इलेव्हन’! सहा भारतीयांचा समावेश
कैफच्या संघाला नमवत रैनाच्या संघाची फायनलमध्ये धडक, सलामी फलंदाजाने झळकावले शानदार शतक