रविवारी (9 फेब्रुवारी) सेनवेस पार्क (Senwes Park), पोटचेफस्ट्रूम (Potchefstroom) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकातील (Under-19 World Cup) अंतिम सामन्यात (Final Match) 19 वर्षांखालील बांगलादेश संघाने 19 वर्षांखालील भारतीय संघाला पराभूत केले आणि विजेतेपद मिळवले.
या विश्वचषकात भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) उत्कृष्ट कामगिरी करत 17 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो या 19 वर्षाखालील विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
आता बिश्नोई आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला आयपीएल 2020 (IPL 2020) साठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने लिलावात विकत घेतले आहे. त्यामुळे बिश्नोई किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक असणारा भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेकडून अनेक गोष्टी शिकण्यासाठीही उत्सुक आहे.
“मला आयपीएलमध्ये अनिल कुंबळे यांच्यासोबत वेळ घालविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्साहात आहे. माझा प्रयत्न असेल की, ते जे काही सांगतील ते नीट ऐकणे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकून घेणे. मी त्यांच्यासोबत राहून माझ्या गोलंदाजीत आणखी चांगल्याप्रकारे सुधार करण्याचा प्रयत्न करेल,” असे बिश्नोईने सांगितले.
आता बिश्नोईला आयपीएलवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आयपीएल 2020 सुरु होण्यासाठी अजून साधारण दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे.
“19 वर्षाखालील विश्वचषक आणि आयपीएल हे कोणत्याही युवा खेळाडूसाठी दोन महत्त्वाचे व्यासपीठ आहेत. या अशा स्पर्धा आहेत, जिथे तुमची कामगिरी पाहिली जाते. या स्पर्धांकडे निवडकर्त्यांचे लक्ष असते. त्यामुळे मी सर्वाेत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. कारण, शेवटी आपल्या सर्वांना भारतीय संघाकडून खेळायचे आहे. मला जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा मला 100 टक्के योगदान द्यायचे आहे,” असे आयपीएलबद्दल सांगताना बिश्नोई म्हणाला.
आरसीबीच्या बदलल्या लोगोवर कॅप्टन कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया
वाचा👉https://t.co/eLAYhaWuF6👈#म #मराठी #Cricket #RCB #IPL2020 @RCBTweets— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020
https://twitter.com/Maha_Sports/status/1228317706601910272