भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळत नाही. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिकेसाठी त्याचा विचार केला गेला नाही. त्यानंतर आता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामात तो राजस्थान संघाची साथ सोडून गुजरात संघात सामील झाला आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून त्याने याबाबतची माहिती दिली.
बिश्नोई याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात राजस्थान क्रिकेट संघटनेकडून केली होती. भारताच्या अंडर नाईन्टीन संघाकडून खेळताना त्याला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर आयपीएल व भारतीय संघ असा प्रवास त्याने केला. आपल्या लेग स्पिनने त्याने अनेकांना प्रभावित केले. मात्र, आता त्याने गुजरात संघाची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने गुजरात संघाची जर्सी परिधान केलेला केलेला फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने गुजरात संघाला टॅग देखील केले. त्याने आतापर्यंत राजस्थान संघासाठी केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळला होता. यामध्ये त्याला दोन बळी मिळवण्यात यश आलेले. दुसरीकडे 87 टी20 सामना खेळताना त्याने 101 बळी टिपले आहेत. तर, 25 लिस्ट ए सामन्यात 36 बळी त्याच्या नावे आहेत. भारताकडून त्याला आतापर्यंत एक वन डे व 10 टी20 सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे.
भारताच्या नव्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात 28 जून पासून होईल. हंगामाच्या सुरुवातीला दुलीप ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी व इराणी या स्पर्धा खेळण्यात येणार आहेत.
(Ravi Bishnoi Will Play For Gujarat In Next Domestic Season)
महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरुजींनी सुचवले टीम इंडियाचे नवे कॉम्बिनेशन! म्हणाले, “ते दोन जण संघात हवेत”
यशस्वीचा राजस्थान रॉयल्सविषयी मोठा खुलासा! म्हणाला, “त्यांनी फक्त मला संधीच दिली नाही तर,…”