---Advertisement---

वडिलांची नजर चुकवून खेळायचा क्रिकेट, आता ठरला १९ वर्षाखालील विश्वचषकाचा हिरो

asia-cup-u19-ind
---Advertisement---

१९ वर्षाखालील विश्वचषक (U19 world cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि उपांत्यपुर्व फेरीत बांग्लादेश संघांना आपल्या गोलंदाजीने जेरीस आणणारा भारताचा वेगवान गोलंदाज म्हणजे रवी कुमार (ravi kumar). त्याचे वडील सीआरपीएफमध्ये आहेत. त्याच्या वडीलांना वाटत होते की, मुलाने खेळाकडे लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परंतु, आता त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सर्वत्र मान मिळत आहे. या लेखात आपण रवी कूमारच्या खडतर प्रवासाबद्दल जाणुन घेऊ. 

रवीच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे क्रिकेटसाठी होणारा खर्च त्याच्या वडीलांना परवडण्यासारखा नव्हता. तरी, रवी गुपचूप क्रिकेट खेळत होता. पण आज त्याचे क्रिकेटमधील भवितव्य उज्ज्वल असल्याचे दिसून येत आहे. त्याचे वडील म्हणतात, ते देशासाठी सीमेवर लढतात आणि मुलगा आता चेंडूंनी देशाचं नाव मोठं करत आहे.

रवीमधील क्रिकेट कौशल्य ओळखले ते, अरविंद भारद्वाज यांनी. ५-६ वर्षांपूर्वी ते एकदा शेतात धावत असताना त्यांनी टेनिस बॉलने खेळणाऱ्या रवीला पाहिले. त्याला पाहून ते प्रभावित झाले. पण, त्यांनी जेव्हा त्याच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांना समजले की त्याच्या वडीलांनी त्याला क्रिकेट न खेळण्यास सांगितले आहे. पण, त्यावेळी अरविंद यांनी त्याच्या वडीलांना समजावले आणि रवीने अकादमीत प्रवेश घेतला.

अरविंद यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, जेव्हा त्याने रवीला पाहिलं तेव्हा त्याच्या गोलंदाजीने तो प्रभावित झाला. रवीच्या घराजवळ त्याची जेडीएस अकादमी होती.

अरविंद यांच्या मते, रवीचा जन्म कोलकाता येथे झाला आणि तो बराच काळ कोलकातामध्ये मोहम्मडन स्पोर्टिंगकडून खेळला. त्याने २०१७ मध्ये विचार केला की, बंगालमध्ये निवडीची शक्यता खूप चांगली आहे. रवीचे काका लीलाधर गौतम हे देखील कोलकातामध्ये राहतात, त्यामुळे तेथे राहण्याची काहीच समस्या नव्हती. त्यानंतर त्यांनी रवीला बालीगंज क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक अमिताभ रॉय यांच्याकडे नेले. रवीला पाहुनच त्यांनी क्लबमध्ये समाविष्ट करुन घेतले. आता रवी बंगालसाठीच खेळणार असल्याचे अरविंदचे यांचे म्हणणे आहे.

अमिताभ रॉय यांचे मते रवी हा असा गोलंदाज आहे, जो विकेट आणि धावा न मिळाल्यावर हार मानत नाही आणि हेच त्याच्या यशाचे सर्वात मोठे कारण आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केएल राहुल इन, ईशान आऊट; तर कुलदीपच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; अशी असू शकते ‘प्लेइंग ११’

जेव्हा लोकांनी सिराजला क्रिकेट सोडून ऑटो चालवण्याचा सल्ला दिला होता, २०१९ च्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---