टी20 विश्वचषक सुरू होण्यासाठी थोडासाच अवधी शिल्लक आहे. भारतीय संघाने आपला दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या बदली खेळाडूची देखील अद्याप घोषणा केली नाही. त्याचवेळी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाविषयी एक मोठी चिंता व्यक्त केली आहे.
मुंबई प्रेस क्लबच्या एका कार्यक्रमात बोलताना यांनी खेळाडूंच्या दुखापती हे भारतीय संघासमोरील एक मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. शास्त्री म्हटले,
“प्रशिक्षक म्हणून तुमच्यासाठी सर्वात निराशाजनक गोष्ट ही असते की, तुमचे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे खेळत नाहीत. माझ्या कार्यकाळात आम्ही दोन वेळा इंग्लंड आणि न्यूझीलंडचा दौरा केला. त्यावेळी भुवनेश्वर कुमार जखमी होता. तो त्या दौऱ्यांवर गेला असता तर त्याला भरपूर यश मिळाले असते. आता दीपक चहरकडे पाहा. तो फार कमी सामने खेळूनही दुखापतग्रस्त झालाय.”
शास्त्री पुढे बोलताना म्हणाले,
“मी नुकतीच एक आकडेवारी पाहिली. 2021 च्या टी20 विश्वचषकापासून बुमराहने फक्त पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यातही तो दुखापतींसह खेळला. सध्या भरपूर क्रिकेट खेळले जातेय. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने होणे अत्यंत गरजेचे आहे.. बीसीसीआयचे अध्यक्ष यात मोठी भूमिका बजावू शकतात. भविष्यात भारतीय संघातील कोणत्याही महत्त्वाच्या खेळाडूला आयपीएलमधील काही सामन्यांसाठी विश्रांती हवी असेल तर, त्याला ती मिळायला हवी. बीसीसीआय अध्यक्ष आणि आयपीएल फ्रेंचाइजी यांच्या दरम्यान याबाबतचा संवाद व्हायला हवा.”
सध्या भारतीय संघाला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासले आहे. विश्वचषकाआधी अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह व दीपक चहर हे देखील दुखापतीमुळे विश्वचषकात खेळणार नाहीत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय भानगड! हरभजन सिंगच्या एकाच आवाजावर हादरलं पंजाब क्रिकेट असोसिएशन, अध्यक्षाने दिला राजीनामा
वनडे विश्वचषकामुळे बीसीसीआय होणार कंगाल? भारत सरकारची नीती ठरणार मारक






