सध्या भारतीय क्रिकेट विविध कारणांनी सतत चर्चेत आहे. भारतीय खेळाडू मैदानावर जबरदस्त कामगिरी करत असताना, मैदानाबाहेर वेगवेगळे वाद निर्माण होत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व विराट कोहली यांच्यातील वाद मिटेपर्यंत अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व कथित वरिष्ठ पत्रकार यांच्यातील वाद समोर आला आहे. आपल्याला या पत्रकाराकडून धोका असल्याचे साहाने म्हटले होते. आता भारताचे माजी कर्णधार व माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे.
काय म्हणाले शास्त्री
वृद्धिमान साहा याने एका वरिष्ठ पत्रकाराला मुलाखत देण्यास नकार दिल्यानंतर त्या पत्रकाराने साहाला पुन्हा कधीही मुलाखत न घेण्याविषयी तसेच कारकीर्दीविषयी टिप्पणी केली होती. साहाने ट्विटरवरून याचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. मात्र, साहाने त्या पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.
खालिद ए-एच अन्सारी यांच्या ‘इट्स अ वंडरफुल वर्ल्ड’ या पुस्तकाच्या लॉन्चिंगवेळी शास्त्री म्हणाले, ‘मला वाटते की, पत्रकार व खेळाडू यांच्यातील नाते खूप बदलले आहे. आम्ही खेळत असताना पत्रकारांशी जे समीकरण होते ते आजच्या खेळाडूंपेक्षा बरेच चांगले होते. मी गेली सात वर्षे ड्रेसिंग रूमचा एक भाग होतो.’
शास्त्री पुढे बोलताना म्हणाले,
“मला लोकांना (पत्रकार आणि खेळाडू) दोष द्यायचा नाही. कारण, आजचे खेळाडू सातत्याने चर्चेत असतात. ते आमच्या काळात नव्हते. आमच्या काळात मुद्रित माध्यमांशिवाय दूरदर्शन नुकतेच सुरू झाले होते. मात्र, आज सोशल मीडियामध्ये मीडिया आणि फोरमच्या उपस्थितीमुळे, क्रीडा कव्हर करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची संख्या आश्चर्यकारकपणे जास्त आहेत. मी काही वेळा खेळाडूंशी चर्चाही केली होती. काही असले तरी खेळाडूंचे अंतिम लक्ष हे खेळावर व चांगली कामगिरी करण्यावरच असते.”
भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सोडल्यानंतर शास्त्री पुन्हा एकदा समालोचनामध्ये सक्रिय होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या-
क्रीडाविश्वातूनही रशियाची कोंडी! फिफासह ऑलिम्पिक संघटनेने केली कडक कारवाई (mahasports.in)
आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार (mahasports.in)