रिषभ पंत याच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल २०२२ हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. यामध्ये दिल्ली संघाचा कर्णधार पंत याचाही हात आहे. पंत दिल्ली संघाच्या विजयात योगदान देण्यात अपयशी ठरला आहे. तो वेगवान सुरुवातीनंतर मोठ्या खेळी खेळण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. अशात भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतला खास सल्ला दिला आहे.
शास्त्रींनी (Ravi Shastri) आयपीएलमध्ये समालोचन करताना सांगितले की, पंतने (Rishabh Pant) टी२० क्रिकेट स्वरूपात ‘आंद्रे रसेल मोड’मध्ये (Andre Russell Mode) फलंदाजी करण्याची गरज आहे. त्याला त्याच्या गतीला कमी करण्याची गरज नाही. जेव्हा तो लयीत असेल, तेव्हा त्याने याच गतीने फलंदाजी करायला पाहिजे, ज्याच्या बळावर तो दिल्ली संघाला अधिकाधिक सामने जिंकून देईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
२४ वर्षीय पंतने चालू हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळताना ३१.२२ च्या सरासरीने २८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ४४ धावा इतकी राहिली आहे. परंतु तो चांगल्या सुरुवातीनंतर त्या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करू शकलेला नाही.
शास्त्री म्हणाले (Ravi Shastri Advice) की, “लक्ष राहुदेत, तू चांगले फटके खेळत आहेस, जास्त विचार करत बसू नकोस. तुझ्यापुढे कोणता गोलंदाज आहे, याने तुला फरक नाही पडला पाहिजे. जर तुला त्याच्याविरुद्ध एखादा फटका मारायचा असेल तर बिनधास्त मार. कोणास ठाऊक, तू लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त संघासाठी सामने जिंकू शकशील.”
शास्त्रींनी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेलविषयी (Andre Russell) बोलताना म्हटले की, “रसेल खूप जास्त चपळ आहे. जर तो मूडमध्ये असेल तर तो खतरनाक सिद्ध होतो. त्याला कोणीही अडवू शकत नाही. तो प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध तुफानी फटकेबाजी करणार. पंतही असे करण्यात सक्षम आहे. मला अपेक्षा आहे की, तो अशाप्रकारेच विचार करेल आणि टी२० क्रिकेटमध्ये खास खेळी खेळेल.”
दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार असून हा सामना ११ मे रोजी, मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा