---Advertisement---

‘ज्याच्या पार्टीत जास्त मजा येईल’, चाहत्याने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर शास्त्रींचे भन्नाट उत्तर

On: शनिवार, मे 21, 2022 4:21 PM
Ravi-Shastri
---Advertisement---

सध्याच्या काळात सोशल मीडिया रोजच्या वापरातील गोष्ट झाली आहे. अनेक क्रिकेटपटूही सोशल मीडियावर सक्रिय असतात. यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा देखील समावेश आहे. शास्त्री अनेकदा सोशल मीडियावर विविध विषयांवर प्रतिक्रिया देत असतात. नुकतेच त्यांनी ट्विटरवर एक प्रश्न-उत्तर सत्र आयोजित केले होते. या सत्रादरम्यान, त्यांनी अनेक चाहत्यांच्या प्रश्नांवर मजेशीर उत्तरे दिली. 

एका चाहत्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील एकाची निवड करण्यास सांगितले. त्यावर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी उत्तर दिले की, ‘ज्याच्या पार्टीत जास्त मजा येईल.’ खरंतर विराट आणि रोहित हे दोन्ही क्रिकेटपटू भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू आहे. तसेच विराटनंतर आता रोहितने भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघांच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाकडून अनेकवर्ष खेळले आहेत.

तसेच एका चाहत्याने एक चित्र शेअर केले आहे. तसेच त्याने शास्त्रींना विचारले की, ‘तुमचे चित्र काढण्यासाठी मला २ तास लागले, प्लीज रिप्लाय’. त्यावर शास्त्री यांनी गमतीने, ‘मिटवून टाक यार’, असे उत्तर लिहिले आहे.

रवी शास्त्री २०१७ ते २०२१ ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले होते. त्याआधी ते भारतीय संघाचे क्रिकेट संचालक होते. तसेच ते १९८१ ते १९९२ दरम्यान भारतीय संघाकडून खेळले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचाही शास्त्री भाग होते.

रवी शास्त्री यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ८० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी ११ शतकांसह ३८३० धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी १५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी १५० वनडे सामने खेळले असून ३१०८ धावा केल्या आहेत आणि १२९ विकेट्स घेतल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: २२ वर्षांच्या गोलंदाजावरही अश्विनला नाही आली दया, गुडघ्यावर बसून मारला ९७ मीटरचा सिक्स

माहीची क्रेझ! चालू सामन्यादरम्यान चाहत्याची धोनीकडे धाव, मग अंपायरने केले असे काही

‘वाह भाई घर हो तो ऐसा!’ गांगुलीपूर्वी ‘या’ ४ भारतीय क्रिकेटर्सनी खरेदी केलीत आलिशान घरं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---