भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची तर गोलंदाजी प्रशिक्षकपदी झहीर खान यांची निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना यांनी याची घोषणा केली.
ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असून मीडिया रिपोर्ट्सनुसार परदेश दौर्यावर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड काम पाहिल. सध्या राहुल द्रविड भारतीय अ संघ आणि अंडर १९ संघ यांचा प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहे.
तर झहीर खानने २०१४ साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून तो एक दिग्गज स्विंग गोलंदाज म्हणून गणला गेला होता.
भारतीय क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षक पदासाठी ५ अर्जदारांच्या सोमवारी मुलाखती घेतल्या होत्या. त्यात वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, टॉम मूडी, रिचर्ड्स पयबूस आणि लालचंद राजपूत यांचा समावेश होता.