---Advertisement---

“सूर्याला कसोटीमध्ये संधी आणि मग खेळ पाहा”; भारतीय दिग्गजाची संघ व्यवस्थापनाकडे मागणी

On: शनिवार, ऑक्टोबर 29, 2022 7:56 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारत आणि नेदरलँड्स संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील 11 वा सामना गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या तीन शिलेदारांनी विस्फोटक फलंदाजी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा घाम काढला आणि अर्धशतकही साजरे केले. यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नावाचाही समावेश आहे. सूर्यकुमारने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवने नेदरलँड्सविरूद्ध पुन्हा एकदा ‌चमकदार खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने डावाच्या अखेरच्य चेंडूवर षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 25 चेंडूवर 7 चौकार व एका षटकाराच्या मदतीने ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नाबाद 51 धावा केल्या.

सूर्यकुमारच्या याच खेळाने प्रभावित झालेल्या रवी शास्त्री यांनी सामन्यानंतर त्याचे कौतुक करताना म्हटले,

“माझ्या मते, सूर्यकुमार यादव हा तिन्ही  प्रकारच्या क्रिकेटचा खेळाडू आहे. मला माहित आहे की, लोक त्यांच्याबाबत बोलताना कसोटी क्रिकेटविषयी बोलत नाहीत. मात्र, मी तुम्हाला सांगतोय की, तो तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळू शकतो. मी तुम्हाला हे सांगितल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, तुम्ही सूर्यकुमारला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवा आणि मग त्याचा खेळ पाहा.”

त्याचवेळी तिथे हजर असलेल्या सूर्यकुमारने शास्त्री यांच्याबद्दल देखील खुलासा केला. तो म्हणाला,

“ज्यावेळी मी भारतासाठी पदार्पण करत होतो, त्यावेळी सर माझ्याकडे आले आणि बिंदास खेळ फक्त इतकेच म्हणाले.”

रवी शास्त्री यांनी 2017 ते 2021 या काळात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त हे काम केल्याने ऑस्ट्रेलियात नेहमी यशस्वी होतो विराट; आकडेवारीही झकास
INDvSA: सामन्याआधी आफ्रिकी खेळाडूची विराटला वॉर्निंग! म्हणाला, ‘तो फॉर्ममध्ये आला असला तरी आमचे गोलंदाज….’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---