नुकतीच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला. ही मालिका होण्यापूर्वी ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत देखील भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. ही मालिका कर्णधार म्हणून विराट कोहलीची (Virat Kohli) शेवटची मालिका ठरली होती. ही मालिका झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विराटवर अनेक जण अपयशी कर्णधार असा शिक्का लावत आहेत. मात्र, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पुढे येत त्याचा बचाव केला आहे. (Ravi Shastri On Virat)
काय म्हणाले शास्त्री?
रवी शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विराटविषयी अनेक वक्तव्ये केली. त्यांनी विराटने कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्याच्या घेतलेला निर्णय योग्य ठरविला. ते म्हणाले,
“हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. यापूर्वीही अनेक मोठ्या खेळाडूंनी कर्णधारपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. मग तो सचिन तेंडुलकर असो, सुनील गावस्कर असो की एमएस धोनी आणि आता विराट कोहली.”
विराटने आपल्या नेतृत्वात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही, याबाबत बोलताना शास्त्री म्हटले,
“आपल्याकडे किती विश्वचषक विजेते कर्णधार आहेत? सचिन सहा विश्वचषक खेळल्यानंतर विश्वचषक जिंकला. राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे हेदेखील कर्णधार होते. त्यांनीही कधी विश्वचषक जिंकला नाही. त्यामुळे त्यांची महानता कमी होत आहे. तुम्ही खेळाशी किती प्रामाणिक आहात याला महत्त्व आहे.”
शास्त्री यांनी या मुलाखतीत विराट अत्याधिक यशस्वी ठरला असता तर काही लोकांना ही गोष्ट पचनी पडली नसती, असे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी विराट हा आणखी दोन वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व करू शकला असता असे देखील म्हटले. त्यांनी विराट हा भारताचा अव्वल कसोटी कर्णधार असल्याच्या पुनरुच्चार देखील केला.
महत्त्वाच्या बातम्या-
आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती (mahasports.in)