भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. साउथॅम्प्टनच्य रोज बाउल स्टेडियममध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. २००० मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्यांचे हे केवळ दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. क्रिकेटच्या या घवघवीत यशानंतर क्रिकेट चाहत्यांसह विविध क्षेत्रातील लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ज्या भारतीय संघाला पराभूत केले त्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील ट्विट करत न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले.
रवी शास्त्री यांनी केले न्यूझीलंड संघाचे अभिनंदन
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला सामन्याच्या अखेरच्या दिवशी, अखेरच्या सत्रात ८ गडी राखून नमवत विजय संपादन केला. या विजयानंतर अनेकांनी न्यूझीलंड संघाचे कौतुक तसेच अभिनंदन केले.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विट करताना लिहिले, ‘या परिस्थितीतील सर्वोत्तम संघ जिंकला. विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी खूप वेळ वाट पाहिल्यानंतर तुम्ही पात्रतेने विजेते झाला. मोठ्या गोष्टी सहज मिळत नाहीत याचे उत्तम उदाहरण. वेल प्लेड न्यूझीलंड, रिस्पेक्ट.’
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1408011558995718148
या लोकांनी देखील केले न्यूझीलंडचे कौतुक
कसोटी विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर अनेक आजी-माजी खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी आपल्या संघाचे कौतुक करताना, ‘तुम्ही आमची मान उंचावली’ असे म्हटले.
भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर व इरफान पठाण यांनी देखील ट्विट करत विजयी संघाचे अभिनंदन केले. प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस व दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी देखील न्यूझीलंड संघाचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट केल्या. अभिनेता आफताब शिवदासानी हा सामना पाहण्यासाठी खास इंग्लंडला गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2021 बाबत चाहत्यांसाठी आली एक आनंदाची बातमी, ‘या क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंना दिली परवानगी
न्यूझीलंडच्या संकेतस्थळाने सोडली पातळी, दाखवला विराटच्या गळ्यात पट्टा
“न्यूझीलंड क्रिकेटमधला हा सुवर्णक्षण, याचे सर्व श्रेय…”, किवी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने






