विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर यांच्यात दमदार भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने ८ गडी राखून हा ऐतिहासिक सामना जिंकला. तब्बल २१ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर न्यूझीलंडने आयसीसी चषक पटकावल्याने एकीकडे त्यांचे संघाचे गुणगान गायले जात आहे. तर, दुसरीकडे भारतीय चाहते भारतीय संघाची निंदा करत आहे. केवळ खेळाडूच नव्हे तर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकेचा भडिमार होताना दिसत आहे.
मागील काही वर्षांपासून भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) आयोजित स्पर्धेंच्या बादफेरीत पराभवास सामोरे जात आहे. भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाना हरवून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. तरीही, अंतिम सामन्यात भारताच्या हाती निशाराच आली. त्यामुळे आता भारकीय चाहते खूपच रागावले आहेत.
भारतीय संघाचे प्रशिक्षक शास्त्री सध्या प्रेक्षकांच्या निशाण्यावर आले आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा ऐतिहासिक सामना अगदी सहजरित्या गमावल्यामुळे सोशल मिडियावर लोकांनी भरभरून मिम्स शेअर केले. त्यात अनेकांनी शास्त्री यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
Pain of two years 🥺, only we got day dreams 💔., Better need good sleep 😴 ., #INDvsNZ #Kohli #RaviShastri #NewZealand congratulations 🥳#India #Cricket Plz plz never do this in #WCT20 pic.twitter.com/ANuquI9dq1
— Karthikeyan Vishnu (@KARTHIKEYAN02_) June 23, 2021
Rahul Dravid is shaping and nurturing cricketing talents whereas #RaviShastri is making money out of those talents. #WTC2021Final pic.twitter.com/q7NsRFPF1C
— Satyam Singh (@MyFreakyTweets) June 23, 2021
#RaviShastri sliding into NZ dressing room to enjoy beer.
#WTC2021Final pic.twitter.com/3nxXCAH2vK— Gen. Sardar (Retd) (@HumorDetected) June 23, 2021
The whole #TeamIndia 's fan has been very sad, But this man 🤷 🤦♂️#TestChampionshipFinal | #RaviShastri | #WTC21final | pic.twitter.com/h3IZ56Z1aS
— Disha (@Disha__here) June 23, 2021
Remove Kohli as a captain or not but do remove this clueless man #RaviShastri from the head coach position for betterment of #TeamIndia. pic.twitter.com/27BjGaQCHv
— Anupriya Saxena (@Anupriyasays) June 23, 2021
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय प्रेक्षकांनी शास्त्री यांचे तोंडभरून कौतुक केले होते. शास्त्री यांचे ड्रेसिंग रूममधील प्रेरणादायी वक्तव्यही खूप व्हायरल झाले होते. परंतु, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे चाहते खूपच संतापले आहेत. दरम्यान श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेले नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक करा, असेही अनेकांनी म्हटले आहे.
Ek hota hai request karna, aur dusra hota hai demand karna…
We cricket fans are demanding a new coach for "Indian Cricket Team"
Thank you #RaviShastri for all your contributions but it's high time to have a new coach for our National Cricket Team…#DravidForCoach pic.twitter.com/6HsobjVrdL
— SAURABH SAGAR (@SAURABHSAGR) June 23, 2021
Greatest CHOKERS in the history of Cricket Kohli 👎👎👎 #INDvNZ #WTC2021Final #bcci #RaviShastri pic.twitter.com/Rd3ozK3ur4
— Abhishek Kumar (@Abhishek_jhaO7) June 23, 2021
केवळ शास्त्रीच नव्हे तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर सपाटून टीका केली जात आहे. अनेकांनी कोहलीला कर्णधारपदावरुन हटवून त्याच्याजागी रोहित शर्मा किंवा अजिंक्य रहाणेला संघनायक करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नवी सुरुवात! आगामी कसोटी चँपियनशीपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, भिडणार ‘या’ संघांशी
‘सर म्हणणे चुकीचे नाही,’ भारतीयांची खिल्ली उडवल्याचा आरोप होत असलेल्या ट्वीटवर मॉर्गनची प्रतिक्रीया
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची ३८ वर्षे