---Advertisement---

माझ्या ग्लासमध्ये लिंबू पाणी असो अथवा…! रवी शास्त्रींचा ‘तो’ व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

On: सोमवार, मार्च 8, 2021 8:22 AM
---Advertisement---

शनिवार (६ मार्च) रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना भारताने एका डावाची आघाडी घेत २५ धावांनी जिंकला. यासह कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडला ३-१ ने पराभूत केले. याबरोबरच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचेही तिकीट मिळवले. भारतीय संघाच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगान व्हायरल होत आहे.

भलेही नेहमी भारतीय संघ एखादी क्रिकेट मालिका जिंको अथवा पराभूत होवो, शास्त्रींवर मीम्स बनणे सातत्याने चालूच आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतरही नेहमीप्रमाणे ट्रोलर्सनी शास्त्रींवर मीम्स व्हायरल केले. याबाबतीत त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले असता, त्यांनी आपल्यावर वारंवार निशाणा साधणाऱ्यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.

शास्त्री म्हणाले की, “काही लोक गंमतीचा भाग म्हणून मीम्स बनवतात, त्याचे मला हसू येते. पण मी लिंबू पितोय का दुध आणि मध याने काय फरक पडतो. जर माझ्यावर मीम्स बनवल्याने कुणाला आनंद मिळत असेल, तर त्यांना बिंदास्त मजा घेऊ देत. जोपर्यंत आमच्या हाती यश येत राहील, तोपर्यंत मला टीकांचा अजिबात फरक पडणार नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगले करता, तेव्हा लोक तुमची वाहवा नक्कीच करतात. पण जेव्हा अपयशी होता, तेव्हा तेच लोक तुम्हाला लाथा घालतात.”

शास्त्रींचा यावेळचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला जवळपास हजारोंच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत विजयी पताका झळकावल्यानंतर भारतीय संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. १२ मार्च ते २० मार्च या कालावधीत ही मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील.

महत्त्वाच्या बातम्या-

‘किंग खान’च्या केकेआरची नजर तिसऱ्या विजेतेपदावर; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत

एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज

“अक्षर पटेल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी पटकावणारा गोलंदाज ठरेल”, माजी दिग्गजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---