भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहे. काही दिवसांपूर्वी आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रोमांचक सामना पार पडला. बीसीसीआयचे माजी अध्यक आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा या सामन्यादरम्यान आमना सामना झाला, पण कुठल्याही प्रकारचे संभाषण मात्र दोघांमध्ये झाले नाही. याच पार्श्वभूमीवर विराट आणि गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आणि आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीं याचीही प्रतिक्रिया समोर येत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून अनेक वर्ष भारतीय संघाचे एकत्र प्रतिनिधित्व केले. अशात शास्त्री आणि विराट एकमेकांना अगदी चांगल्या पद्धतीने ओळखतात. दुसरीकडे बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिल्यानंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly) सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या डायरेक्टरची भूमिका पार पाडत आहेत. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 15 एप्रिल रोजी खेळला गेला. आरसीबीने या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवलाच, पण विराट आणि गांगुली यांच्यातील वाद देखील सर्वांसमोर उघड झाला. सामन्यादरम्यान विराटने दिल्लीच्या जगआउटकडे रागात पाहिले, ज्याठिकाणी गांगुली स्वतः बसले हेते. तर सामना संपल्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केले आणि एकमेकांशी हात देखील मिळवला नाही. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
नुकतेच एका माध्यमाशी बोलताना रवी शास्त्रींनी या वादावर आपले मत व्यक्त केले. शास्त्रींना विराट आणि गांगुलीचे नाव न घेता त्यांच्यातील वादाविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर शास्त्री म्हणाले की, “माझे समोरच्या व्यक्तिशी काय नाते आहे, त्यावर त्याच्याशी बोलायचे की नाही, हे ठरते. जर माझी बोलण्याची जराही इच्छा नसेल, तर मी त्या व्यक्तीला जाऊ देतो. पण शेवटी जेव्हा तुम्ही या गोष्टींच्या खोलात जाता आणि बसून विचार करता, तेव्हा जाणवते की, या गोष्टी मागे टाकून पुढे जाण्याची संधी आपल्याकडे आहे. मग तुमचे वय कितीही असुद्या.”
तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉटसन यानेही विराट आणि गांगुली यांच्यातील वादाच्या चर्चा ऐकल्यानंतर आपले मत मांडले होते. “अशा चर्चा आहेत, ज्याच्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. पण विराट कोहली रागात होते, हे स्पष्ट आहे. विरोधी संघात खेळताना त्याला या गोष्टीची गरजही असू शकते. विराट जेव्हा रागात असतो, तेव्हा आपले सर्वोत्तम प्रदर्शन देतो. त्यामुळे काहीही असू शकते.” दरम्यान, 2021 टी-20 विश्वचषकानंतर विराटने टी-20 प्रकाराचे कर्णधारपद सोडल्यानंतर दोघांमधील वाद सुरू झाला. गांगुली म्हटल्याप्रमाणे त्यांनी विराटला कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विराटने पत्रकार परिषदेत त्याला कोणीही कसलाही सल्ल दिला नव्हता. या प्रसंगापासून दोघांमधील कडवटपणा वाढत गेल्याचे मागच्या मोठ्या काळापासून पाहायला मिळाले आहे. (Ravi Shastri has reacted to the controversy between Virat Kohli and Sourav Ganguly)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो पंड्या नेतृत्वात स्मार्ट, पण लखनऊ…’, पराभवानंतर दिग्गजाने पुन्हा साधला राहुलवर निशाणा
संजूच्या ‘रॉयल्स’ने जिंकला टॉस, RCB संघ विराटच्याच नेतृत्वाखाली देणार ‘टॉपर’ला झुंज