भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली याच्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. शास्त्रींच्या मते विराटने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याऐवजी चौथ्या क्रमांकावर खेळले पाहिजे. आगामी वनडे विश्वचषकात या गोष्टीचा फायदा भारतीय संघाला होईल. सोबतच शास्त्रींनी रोहित शर्मा याच्यासाठीही खास सल्ला दिला.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मते विराट कोहली (Virat Kohli) विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. यापूर्वीच्या विश्वचषकात देखील विराटने चौथ्या क्रमांकावर खेळावे, अशी त्यांची इच्छा होती. सोबत रोहित शर्मा () आपल्या अनुभवाच्या जोरावर तिसऱ्या क्रमांकाचा भार पेलू शकतो, अशेही शास्त्रींना वाटते. विश्वचषक 2019 (ICC WC 2009) दरम्यान, शास्त्री भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी खेलाडूंच्या फलंदाजी क्रमाविषयी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद (MSK Prasad) याच्याशीही चर्चा केली होती.
विराट कोहलीविषयी रवी शास्त्री म्हणाले, “जर विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला सांगितले, तर तो संघाचे हित पाहून या क्रमांकावर करेल. एक वेळ होती, जेव्हा मझी इच्छा देखील हीच होती. मागच्या विश्वचषकात मी संघाचा मुख्य प्रशिक्षक होतो आणि मी देखील यावर विचार केला होता. यासंदर्भात एमएसके प्रसाद यांच्याशी चर्चा देखील झाली होती. माझ्या मते वरच्या फळीतील दोन तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले, तर संघ लोकडून जाईल. नंतर झाले देखील असेच. विराटची आकडेवारी पाहिली तर तो चौथ्या क्रमांकावर देखील चांगला खेळला आहे.”
दरम्यान, विराट कोहली आयसीसी विश्वचषक 2011 मध्ये चौथ्या क्रमांकावर खेळला होता. तेव्हा भारतासाठी वरच्या फळीत सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे फलंदाज खेळत होते. मध्यक्रमात विराटसह युवराज सिंग आणि एमएस धोनी यांनी अप्रतिम प्रदर्शन केले होते. 2019 विश्वचषकाचा विचार केला, तर विराटने 55.37च्या सरासरीने 443 धावा केल्या होत्या. यात पाच अर्धशतकांचा समावेश होता. यावर्षीचा विश्वचषक भारताने जिंकला, तर विराटसाठी हा दुसरा विश्वचषक विजय असेल. अशात तो पहिला भारतीय बनू शकतो, जो दोन वेळा विश्वचषक उचावू शकला. (Ravi Shastri has suggested changes in India’s batting order.)
महत्वाच्या बातम्या –
“मुले मुलांविरुद्ध खेळताना दिग्गज वाटतात”, गावसकरांची टीम इंडियावर खोचक टीका
‘ब्लास्टर’ ब्रुकची वर्ल्डकप वारी हुकली! ‘या’ कारणाने निवडसमितीने दाखवला अविश्वास