---Advertisement---

‘एका कर्णधाराकडून अजून….’ गिलच्या खेळीचं रवी शास्त्रीकडून भरभरून कौतुक!

On: बुधवार, जुलै 9, 2025 7:09 AM
---Advertisement---

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुबमन गिल सध्या कसोटी स्वरूपात चमकदार कामगिरी करत आहे. कर्णधारपदासोबतच तो फलंदाजीतही भरपूर धावा काढत आहे. लीड्स कसोटी सामन्यात त्याने 147 धावांची खेळी केली, पण टीम इंडियाला तिथे पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 269 धावा केल्या.तर दुसऱ्या डावात तो 161 धावा करून बाद झाला. शुबमन गिलची शानदार कामगिरी पाहून आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीने त्याचे कौतुक केले आहे.

रवी शास्त्रीने फलंदाजी आणि कर्णधारपद दोन्हीमध्ये शुबमन गिलला पूर्ण गुण दिले आहेत. तो म्हणाला की तो मला ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमनची आठवण करून देतो, ज्याची कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 ची अद्भुत सरासरी आहे. शास्त्री स्काय स्पोर्ट्स पॉडकास्टमध्ये म्हणाले की तो कर्णधार म्हणून सर्वोत्तम आहे. 10 पैकी 10. म्हणजे तुम्ही कर्णधाराकडून यापेक्षा जास्त काही मागू शकत नाही. तुम्ही मालिकेत 1-0 ने मागे होता, तिथून येऊन ब्रॅडमन सारखी फलंदाजी करुन 269 आणि 161 धावा केल्या आणि सामना जिंकवला.

या पॉडकास्टमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथर्टन, नासेर हुसेन आणि माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हे देखील शास्त्रीसोबत उपस्थित होते. शास्त्री पुढे म्हणाले की, पहिल्या कसोटीत त्याचे नेतृत्व खूप प्रतिक्रियाशील होते.तो चेंडूच्या मागे धावत होता. पुढच्या सामन्यात पण खूप सक्रिय होता. त्याने आकाश दीपची निवड करून इंग्लंडच्या परिस्थितीत कदाचित संघाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मैदानात उतरवला, जो मालिकेत इंग्लंडला त्रास देत राहील.

दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीपची कामगिरी खूप चांगली होती. एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 4 घेतले, तर दुसऱ्या डावात त्याने 6 बळी घेतले. या सामन्यात त्याने एकूण 10 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याची उत्कृष्ट गोलंदाजी पाहिल्यानंतर तो तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळेल हे जवळजवळ निश्चित झाले आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह देखील उपलब्ध असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---