भारतीय संघाने नुकतेच न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. आता बुधवारपासून(6 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे.
यानंतर ऑस्ट्रेलिया संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ मायदेशात 24 फेब्रुवारी पासून 3 सामन्यांची टी20 मालिका आणि 5 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
मात्र या मालिकेत शिखर धवन, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. याबद्दल भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या एका मुलाखतीत बोलताना इशारा दिला आहे.
शास्त्री म्हणाले, ‘आम्ही निवड समितीशी याबद्दल बोललो आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेदरम्यान काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा प्रयत्न करु. सध्या शमीला विश्रांतीची गरज आहे. जसप्रीत बुमराह परत येणार आहे. आम्ही भुवनेश्वर कुमारकडेही लक्ष देणार आहोत. जेणेकरुन गरज असेल तेव्हा आम्हाला त्याला आराम देता येईल.’
तसेच पुढे शास्त्री म्हणाले, ‘रोहित शर्मा आणि शिखर धवन हे देखील सलग खेळत आहे. तसेच त्यांनाही पुढे नियमितपणे खेळावे लागणार आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंना आत्ता संधी दिली तर आमची बेंच स्ट्रेंथही पारखण्याची ही आमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे.’
जर भारताने रोहित आणि शिखरला विश्रांती दिली तर भारताकडे केएल राहुल, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल असे सलामीवीर म्हणून पर्याय आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–पंड्यावर कडाडून टीका करणारा दिग्गज क्रिकेटपटू आता करतोय त्याचेच कौतुक
–कोहली फॅन्सच टेन्शन वाढलं, रोहित विराटचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी सज्ज
–२०१९च्या विश्वचषकात हा खेळाडू असणार रोहित-धवनला पर्याय
–१२०४ फलंदाजांनी ज्याचा विचारही केला नसेल तो विक्रम करण्यासाठी रोहित सज्ज