प्रत्येक क्षेत्रात प्रशिक्षकाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे क्रीडा प्रकारात तर या पदाला विशेष महत्त्व आहे. कारण मैदानावर जरी खेळाडू खेळत असले, तरी त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनविण्याचे काम हे प्रशिक्षकाचे असते. त्यामुळे कोणत्याही सामन्यात होणारी हार- जीत ही कर्णधाराच्या आणि प्रशिक्षकाच्या रणनितीवर अवलंबून असते.
सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका ही रवी शास्त्री निभावत आहेत. शास्त्री यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाने
तीनही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये उज्ज्वल कामगिरी केली आहे. त्याचबरोबर काही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून ऐन मोक्याच्या क्षणी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक शास्त्री यांचा कालखंड संपत आला आहे. त्यामुळे त्यांच्या पदभार सोडण्याने नवीन प्रशिक्षक कोण होईल. याबद्दल आपण या लेखात 3 संभाव्य प्रशिक्षक होवू शकणार्या दिग्गजांबद्दल जाणून घेणार आहोत.
1. राहुल द्रविड
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड हा प्रशिक्षक होण्याची भूमिका पार पाडू शकतो. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम करतो. त्याचबरोबर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. भारतीय संघातील बरेच खेळाडू हे शास्त्री यांच्याऐवजी द्रविडने केलेल्या मार्गदर्शनाची स्तुती करताना दिसून येतात.
भारतीय संघाचे भावी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याचे नाव सध्या चर्चेत आहे. कारण त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलेल्या खेळाडूंचा भरणा भारतीय संघात आहे. परंतु सध्या राहुल द्रविडने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
2. रिकी पाँटिंग
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज रिकी पाँटिंग भारतीय संघाचा भावी प्रशिक्षक होईल अशी जोरदार चर्चा आहे. रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना असे कित्येक विक्रम केले आहेत, जे आज ही अबाधित आहेत. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारे अंतिम सामन्यामध्ये धडक मारली होती, ही कामगिरी अर्थातच उल्लेखनीय आहे.
त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघासोबत प्रशिक्षक म्हणून असताना त्याच्या मार्गदर्शनाखाली या संघाने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पाँटिंगच्या प्रशिक्षणाच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघात सहभागी असलेले खेळाडू, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शिखर धवन, जसप्रीत बुमराहसारखे बरेच खेळाडू आयपीएलमध्ये पाँटिंग च्या मार्गदर्शनाखाली खेळले आहेत. त्यामुळे त्यांची भारतीय प्रशिक्षक होण्याची शक्यता जास्त आहे.
3. माहेला जयवर्धने
भारतीय संघासाठी माहेला जयवर्धने हा एक प्रशिक्षक म्हणून चांगला पर्याय आहे. जयवर्धने हा श्रीलंका संघाचा माजी दिग्गज खेळाडू आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट संघासाठी आपल्या फलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2015 मध्ये त्याने प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. तो 2015 साली इंग्लंड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक होता. त्याच्यानंतर बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये कुलना टायगर्स संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर 2017 साली मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याने अतिशय उल्लेखनीय कामगिरी निभावली आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने मागील 4 वर्षात 3 वेळा विजेतेपद पटकावले आहे. अशा प्रशिक्षकांना भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले, तर आगामी काळात भारतीय संघाचे टी-20 मध्ये भविष्य उज्ज्वल होईल.
ट्रेंडिंग लेख-
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी






