भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) यांना पुन्हा एकदा समालोचकांच्या भुमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची प्रतिक्षा लांबली आहे. भारत आणि वेस्ट इंडीज टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी ७ समालोचकांची नावे निश्चित झाली आहेत. रवी शास्त्रींचे नाव या सात समालोचकांमध्ये नाही. अशात चाहत्यांना शास्त्रींनी पुन्हा एकदा माईक हातात पकडेला पाहण्यासाठी किमान आयपीएल २०२२ पर्यंत वाट पाहावी लागेल.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील होणाऱ्या या मायदेशातील मालिकेसाठी नियुक्त केल्या गेलल्या सात समालोचकांमध्ये, माजी कर्णधार सुनील गावसकर, अजित अगरकर, हर्षा भोगले, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता आणि लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचा सहभाग आहे. त्याव्यतिरिक्त वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशनही या यादीत सहभागी आहेत.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे, तर टी-२० मालिका १६ फेब्रुवारीला सुरू होईल. या मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. शास्त्री श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही समालोचन करणार नाहीत.
शास्त्री येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या गुडघ्यावर मुंबईमध्ये शस्त्रक्रिया करवून घेणार असल्याकारणाने ते भारत- वेस्ट इंडिजमधील मालिकांमध्ये समालोचन करताना दिसणार नाहीत. याबाबत माहिती देताना शास्त्री म्हणाले की, “माझा गुडघा गेल्या काही वर्षांपासून मला खूप त्रास देतो आहे. पण भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष देऊ शकतो नाही. पण आता येत्या आठवड्यात मी माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन करून घेणार आहे.”
दरम्यान शास्त्रींनी मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघाची साथ सोडली. टी-२० विश्वचषकानंतर त्यांचा संघासोबतचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला, त्यानंतर त्यांनी पुन्हा या पदासाठी अर्ज केला नाही. आता राहुल द्रविड यांनी शास्त्रींच्या जागी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. शास्त्रींनी मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर अशा बातम्या समोर आल्या होत्या की, ते लवकरच समालोचकाच्या त्यांच्या जुन्या भूमिकेत दिसतील, पण चाहत्यांना यासाठी आता अधिक वाट पाहावी लागणार आहे. शास्त्री सध्या खेळल्या जाणाऱ्या लिजेंड्स क्रिकेट लीगच्या आयुक्तपदी कार्यरत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
मी कसा काय पडलो? मैदानावर उलट धावताना धपाक्कन कोसळला अंपायर, स्क्रिनवर सर्वांनीच पाहिलं
वेस्ट इंडिजविरुद्ध युवा खांद्यांवर गोलंदाजीची धुरा; ‘या’; दोघांचे होणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?
वेस्ट इंडिज संघातील दुफळीच्या चर्चांनंतर बोर्डाकडून आली प्रतिक्रिया; वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –