---Advertisement---

आयपीएल फ्रँचायझीच्या प्रशिक्षणाची सूत्रे हाती घेण्यासाठी शास्त्री सज्ज; म्हणाले, ‘मला १०० टक्के प्रशिक्षक…’

On: मंगळवार, डिसेंबर 7, 2021 1:57 PM
Ravi Shastri
---Advertisement---

भारताचे माजी अष्टपैलू रवी शास्त्री यांचा राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपून काही दिवसच झाले आहेत. यानंतर शास्त्री हे समालोचन किंवा जगप्रसिद्ध टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रशिक्षक बनू शकतात अशी चर्चा आहे. आता स्वत: शास्त्री यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Ravi Shastri On Franchise Coaching)

संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ सह रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्यानंतर आता राहुल द्रविड यांच्याहाती भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे देण्यात आली आहेत. राष्ट्रीय संघावरील जबाबदारी संपल्यानंतर शास्त्री आयपीएल २०२२ मधील नवी फ्रँचायझी, अहमदाबाद संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.

याविषयी ‘द विक’ला दिलेल्या एका मुलाखतीत शास्त्री म्हणाले की, “मला १०० टक्के कोणत्या फ्रँचायझीचा प्रशिक्षक बनायला आवडेल. मी प्रसारणाचेही काम नक्कीच करेल. मला यामध्ये गेल्या २५ वर्षांचा अनुभव असून मी जगभरात फिरलो आहे. याव्यतिरिक्त मला हे पण माहिती आहे की, आधुनिक काळातील खेळाडू कशाप्रकारे विचार करतात.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातच आपण संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा विचार केला असल्याचे शास्त्रींचे म्हणणे आहे. “मी इंग्लंडमध्येच विचार केला होता की, आता भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यातून मुक्त व्हायचे. त्यावेळी आम्ही जवळपास २ वर्षे बाहेर होतो. मलाही माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता. प्रत्येक गोष्टीसाठी निश्चित वेळ आणि जागा ठरलेली असते. माझा प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. मी विना कोणत्या अजेंड्यासह या क्षेत्रात उतरलो आणि सर्वकाही केले आहे,” असे ते पुढे म्हणाले.

तसेच शास्त्रींनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वाचीही भरपूर प्रशंसा केली. विराटविषयी बोलताना शास्त्री म्हणाले की, “तो एक कुशल कर्णधार राहिला आहे. लोक नेहमी तुमची परिणामांवरुन गणना करतात. जसे की, तुम्ही कशा धावा केल्या याला कोण महत्त्व देत नाही तर तुम्ही किती धावा केल्या याला अधिक महत्त्व असते. विराट चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. तो एका खेळाडूच्या रुपात परिपक्व झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार बनने वाटते तितके सोपे नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ्या मनाचा विराट! हॉटेलमधून बाहेर येताना कोहलीने चाहत्याचा वाढदिवस केला स्पेशल, पाहा व्हिडिओ

काय सांगता! एकदा दोनदा नव्हे, तर या तीन वेळेस संघातील सर्व ११ खेळाडूंना देण्यात आला होता सामनावीर पुरस्कार

मालिकावीर पुरस्कार पटकावताच आर अश्विनची कॅलिसशी बरोबरी, आता नजर मुरलीधरनच्या विक्रमावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---